Mamata-Modi Meet : मुख्यमंत्री ममता बनर्जींनी घेतली पंतप्रधानांची भेट | पुढारी

Mamata-Modi Meet : मुख्यमंत्री ममता बनर्जींनी घेतली पंतप्रधानांची भेट

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा

केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकारमधील राजकीय मतभेदांचा परिणाम विकासावर पडू नये, असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी बुधवारी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून एप्रिल-२०२२ मध्ये पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘बिजनेस समीट’ चे आमंत्रण दिल्याची माहिती बनर्जी यांनी भेटीनंतर पत्रकारांसोबत बोलतांना दिली. (Mamata-Modi Meet)

राजकीय विरोध आपल्या ठिकाणी योग्य आहे. पंरतु, भेटीगाठी सुरू राहील्या पाहिजे. राजकारण आणि विकासातील संबंध हे वेगवेगळे आहेत, असे बनर्जी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांसोबतच्या भेटीदरम्यान त्रिपुरा हिंसाचारासह इतर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली.

कोल्हापूर : भुखंड माफीया असणा-या ‘भास्कर डॉन गँग’वर मोक्का अंतर्गत कारवाई

भेटी दरम्यान, सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) देण्यात आलेल्या अधिकारांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, हे पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिल्याचे बनर्जी म्हणाल्या. अनेकदा सीमेवर जवानांकडून चालवण्यात येणाऱ्या गोळीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू होतो. अशात संघराज्य व्यवस्थेला वाचवण्याची आवश्यकता आहे. बीएसएफ संबंधी काढण्यात आलेले आदेश मागे घ्यावे, अशी विनंती बनर्जी यांच्याकडून करण्यात आली. (Mamata-Modi Meet)

राज्यात अनेकदा वादळे आली, नैसर्गिक संकटे आली. पंरतु, केंद्राकडून मदत मिळाली नाही. अशात राज्य कसे चालवायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोरोना लसीकरणासंबंधी देखील त्यांनी पंतप्रधानांसोबत चर्चा केली.

जुट उत्पादन शेतकऱ्यांना आता जूट ची विक्री करता येत नाही. अशात जूट विक्रीवर निर्बंध आणणारे ‘कॅपिंग’ हटवण्याची विनंती पंतप्रधानांकडे केल्याचे बनर्जी म्हणाले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव व्हावी, अशी इच्छा आहे. अखिलेश यादव यांनी हवी असल्यास मदत करण्यास तयार आहे, असे बनर्जी म्हणाल्या.

येत्या ३० नोव्हेंबरला मुंबईत जावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे बनर्जी म्हणाल्या.

हे ही वाचा :

Back to top button