Blasphemy Law : ईशनिंदा कायदा करण्याची राज्यसभेत मागणी | पुढारी

Blasphemy Law : ईशनिंदा कायदा करण्याची राज्यसभेत मागणी

नवी दिल्ली : आजकाल धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार वाढले असून त्याला आळा घालण्यासाठी ईशनिंदा कायदा बनवावा, अशी मागणी भाजप खासदार डॉ. अशोक वाजपेयी यांनी केली आहे. (Blasphemy Law)

ज्यसभेत बोलताना डॉ. वाजपेयी म्हणाले की, आमचा उदार मतवाद आणि सहिष्णुताच आमची कमजोरी झाली असून येता-जाता हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवल्या जात आहेत. देवदेवतांबाबत बेलगाम विधाने केली जातात. याबाबत कडक कायदा नसल्याने हे प्रकार होत आहेत. आज जगातील १०० हून अधिक देशांत ईशनिंदा कायदे आहेत. त्यामुळे ईशनिंदा कायदा बनवावा व धर्माचा कोणत्याही प्रकारे अपमान करणाऱ्यास कठोर शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी डॉ. वाजपेयी यांनी केली. (Blasphemy Law)

हेही वाचा : 

Back to top button