पुढारी ऑनलाईन डेस्क: राजस्थानचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांची यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची एकाचवेळी कोविड आणि स्वाइन फ्लूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सूचनेनुसार गेहलोत सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. या संदर्भातील माहिती गहलोत यांनी एक्स सोशल मीडियावर शेअर केली आहे. (Ashok Gehlot Health)
अशोक गेहलोत यांनी एक्सवर पोस्ट करताना लिहिले आहे की, गेल्या काही दिवसांपासून ताप असल्याने आज डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी झाली. ज्यामध्ये कोरोना आणि स्वाइन फ्लूची पुष्टी झाली आहे. यामुळे मला पुढील सात दिवस भेटता येणार नाही. या बदलत्या ऋतूमध्ये आपण सर्वांनी आपल्या आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे, असे गेहलोत यांनी म्हटले आहे. (Ashok Gehlot Health)