कोव्हॅक्सिनच्या प्रभाव ५०% : लान्सेट जर्नल | पुढारी

 कोव्हॅक्सिनच्या प्रभाव ५०% : लान्सेट जर्नल

पुढारी; ऑनलाईन डेस्क

कोव्हॅक्सिनच्या दोन डोसचा कोव्हिड १९ विरुद्धचा प्रभाव ५० टक्के इतका असल्याचा निष्कर्ष नव्याने झालेल्या संशोधनातून पुढे आला आहे. हा अभ्यास The Lancet Infectious Diseases journal मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. नवी दिल्ली येथील AIIMSमध्ये कार्यरत असलेल्या २७१४ कर्मचाऱ्यांवर अभ्यास करून हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

लक्षण दिसणारे आणि RT-PCR टेस्ट झालेल्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला. १५ एप्रिल ते १५ मे या कालवधित हा अभ्यास करण्यात आला.

भारतात जेव्हा दुसरी लाट आली होती, त्या कालावधीतील हे संशोधन आहे. कोव्हिड १९चा डेल्टा व्हॅरिएंट या कालवधित प्रभावी होती. कोव्हॅक्सिन घेतलेल्या आणि कोरोना संसर्गा होण्याची शक्यता असलेल्या समूहाचा यात अभ्यास करण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्ष स्थितीत कोव्हॅक्सिन किती प्रभावी आहे, याचा निष्कर्ष या अभ्यासातून काढता आला आहे.

ICMR आणि भारत बायोटेक यांनी हे व्हॅक्सिन विकसित केले आहे. भारतात जानेवारी महिन्यात या व्हॅक्सिनच्या आणीबाणीच्या काळात प्रौढांना देण्यासाठी मंजुरी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने या व्हॅक्सिनच्या आणीबाणीच्या काळात वापरासाठी मंजुरी दिली आहे.

हेही वाचलत का?

Back to top button