Budget 2024 session : राष्ट्रपती मुर्मू यांचे आज अभिभाषण; उद्या सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार | पुढारी

Budget 2024 session : राष्ट्रपती मुर्मू यांचे आज अभिभाषण; उद्या सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. नारीशक्तीच्या साक्षात्काराचे हे पर्व सुरु आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (Budget 2024 session) अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत होते. मोदी म्हणाले, या नवीन संसद भवनात झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या शेवटी या संसदेने अतिशय सन्मानजनक निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ (Nari Shakti Vandan Adhiniyam). २६ जानेवारी रोजी देखील आपण कर्तव्याच्या मार्गावर महिला शक्तीचे शौर्य, सामर्थ्य आणि दृढनिश्चय देशाने कसा अनुभवला हे पाहिले आहे. (Budget 2024 session)

संबंधित बातम्या – 

”निवडणूक जेव्हा जवळ येते, तेव्हा बजेटवर सर्वांचे लक्ष असते. पूर्ण बजेट नवे सरकार सत्तेत आल्यानंतर समोर घेऊन येऊ. देशाच्या अर्थमंत्री सीतारामन उद्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देश सातत्याने प्रगती करत पुढे जात आहे. देशाचा सर्वसमावेशक, सर्वांगीण विकास होत आहे. ही प्रगती सातत्याने होत राहिल.” देशहिताचा विचार करा, देशाला उत्साह, उमंगाने भरा, असेही आवाहन त्यांनी केले.

Back to top button