‘सासू माझा मेकअप वापरते, मला घटस्‍फोट हवा’ : विवाहितेची अजब मागणी

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : 'नवरा केवळ त्‍याच्‍या आईचे ऐकतो. माझ्‍या परवानगीशिवाय सासू माझे मेकअपचे साहित्‍य विनापरवानगी वापरते', असे अजब कारण देत आग्रा येथील एका विवाहितेने घटस्‍फोटासाठीची मागणी केली आहे. संबंधित विवाहितेचे समुपदेशन करण्‍यात आले. मात्र ती आपल्‍या मागणीवर ठाम आहे. मात्र तिचे पुन्‍हा एकदा समुपदेशन करण्‍यात येणार आहे. ( Agra woman seeks divorce over mother-in-law using her make-up kit )

'इंडिया टूडे'ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, मालपुरा येथील रविवासी असणार्‍या दोन तरुणींचे आग्रा येथील एकाच कुटुंबातील दोन सख्‍ख्‍या भावांशी आठ महिन्‍यांपूर्वी विवाह झाला होता. कोणत्‍याही कार्यक्रमा आधी सासू तिचे मेकअपचे साहित्‍य वापरत असे. याची तक्रार तिने पतीकडे केली. हा प्रकार वारंवार घडू लागल्‍यानंतर पतीने आपल्‍या आईची बाजू घेत मारहाण करत मला आणि माझ्‍या बहिणीला घराबाहेर काढले, अशी तक्रार विवाहितेने आग्रा पोलिस ठाण्‍यात दिली. याची दखल आग्रा पोलीस ठाण्‍यातील कौटुंबिक समुपदेशन केंद्राने घेतली. ( Agra woman seeks divorce over mother-in-law using her make-up kit )

विवाहिता घटस्‍फोटाच्‍या मागणीवर ठाम

या प्रकरणी कौटुंबिक समुपदेशन केंद्राच्‍या अधिकारी गौर यांनी सांगितले की, संबंधित विवाहितेच्‍या परवानगीशवाय तिच्‍या मेकअपच्‍या साहित्‍याचा वापर सासू करत होती. याची तक्रार केल्‍यानंतर पतीनेही तिला मारहाण करत तिला घराबाहेर काढले. गेल्‍या दोन महिन्‍यांपासून दोन्‍ही बहिणी माहेरी राहत होत्‍या. रविवार, २८ जानेवारी रोजी महिला आणि तिच्‍या सासू-सासर्‍यांना कौटुंबिक समुपदेशन केंद्रात बोलविण्‍यात आले. यावेळी विवाहितेची समजूत काढण्‍यात आली. मात्र : 'नवरा केवळ त्‍याच्‍या आईचे ऐकतो. माझ्‍या परवानगीशिवाय सासू माझे मेकअपचे साहित्‍य वापरते', असे कारण देत विवाहिता घटस्‍फोटाच्‍या मागणीवर ठाम राहिली आहे. ( Agra woman seeks divorce over mother-in-law using her make-up kit )

दाम्‍पत्‍याचे पुन्‍हा एकदा हाेणार समुपदेशन

या प्रकरणाी आग्रा पोलिसांच्‍या कौटुंबिक समुपदेशन केंद्राने विवाहितेची समजूत काढली. मात्र ती आपल्‍या निर्णयावर ठाम राहिली आहे. पती मारहाण केल्‍याचे विवाहितेने तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यामुळे आता विवाहिता आणि तिच्‍या पतीलाही पुढील समुपदेशानसाठी बाेलवले आहे. दाेघांची समजूत काढून त्‍यांचा संसार टिकविण्‍याचा प्रयत्‍न  कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडून केला जाणार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news