“कचरा पुन्‍हा कचराकुंडित गेला…” : लालूंच्‍या कन्‍येचा नितीश कुमारांवर घणाघाती हल्‍ला | पुढारी

"कचरा पुन्‍हा कचराकुंडित गेला..." : लालूंच्‍या कन्‍येचा नितीश कुमारांवर घणाघाती हल्‍ला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहारमधील राजकीय रंग आज (दि.२८) पुन्‍हा बदलले. मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा देत नितीशकुमारांनी राष्‍ट्रीय जनता दलाची साथ सोडली. तसेच पुन्‍हा एकदा भाजपबरोबर सत्ताग्रहण करणार असल्‍याचेही जाहीर केले. या राजकीय घडामोडींवर राष्‍ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्‍यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्‍या कन्‍या रोहिणी आचार्य-यादव यांनी घणाघाती हल्‍ला केला आहे. आपल्‍या अधिकृत X हँडलवर एका पाठोपाठ एक पोस्ट शेअर करत नितीशकुमारांवर बोचरी टीका केली आहे. (Lalu Yadav’s daughter Rohini Acharya took a dig at Nitish Kumar)

रोहिणी यांनी आपल्‍या पहिल्‍या पोस्‍टमध्‍ये कचराकुंडी गाडीचा फोटो शेअर करत ‘कचरा पुन्हा कचराकुडीत गेला’, असे म्‍हटले आहे. दरम्यान, रोहिणीच्या आजच्या ट्विटनंतर काही तासांनंतर, शिवसेना (UBT) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी X वर लिहिले, “रोहिणी आचार्य यांनी जे ट्विट केले ते कदाचित भाजप समर्थकांसह संपूर्ण देशाच्या भावना होत्या.” (Lalu Yadav’s daughter Rohini Acharya took a dig at Nitish Kumar)

नितीश कुमारांच्‍या राजीनाम्‍यापूर्वीही पल्‍लवी आचार्याच्‍या पोस्टची झाली होती चर्चा

बुधवारी, २४ जानेवारी रोजी कर्पुरी यांच्‍या जयंतीनिमित्त कार्यक्रमान नितीश कुमारांनी घरणेशाहीचा उल्‍लेख करत अप्रत्‍यक्ष लालूप्रसाद कुटुंबीयांवर निशाणा साधला होता. यानंतर रोहिणी यादव यांनी सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून नितीश कुमारांवर निशाणा साधला होता. त्‍यांनी पहिल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले की, “अनेकदा काही लोक स्वतःच्या उणीवा पाहू शकत नाहीत; परंतु इतरांवर चिखलफेक करण्यासाठी गैरवर्तनाचा अवलंब करतात …”. रोहिणी यांनी काही वेळाने आणखी एक पाेस्‍ट लिहिली की, “तुम्ही तुमचा राग व्यक्त केला तर काय होईल, तुमची स्वतःची लायकी नसेल? जेव्हा स्वतःचे हेतू चुकत असतील तेव्हा कायद्याच्या नियमांकडे कोण दुर्लक्ष करू शकेल.” रोहिणी यांनी केलेल्‍या दोन्‍ही पोस्‍ट अप्रत्‍यक्षपणे नितीश कुमारांवर अप्रत्‍यक्ष हल्‍ला करणार्‍या होत्‍या. यावर नितीश कुमारांनी तीव्र नाराजी व्‍यक्‍त केल्‍यानंतर तत्‍काळ त्‍या हटविल्‍याही होत्‍या. आता नितीश कुमारांनी राष्‍ट्रीय जनता दलाबरोबर काडीमोड घेतल्‍यामुळे पल्‍लवी यादव यांनी सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून नितीश कुमारांवर जोरदार हल्‍लाबोल केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button