Mallikarjun Kharge & Mamata Banerjee | मल्लिकार्जुन खर्गेंचे पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पत्र, म्हणाले… | पुढारी

Mallikarjun Kharge & Mamata Banerjee | मल्लिकार्जुन खर्गेंचे पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पत्र, म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या पश्चिम बंगालमधून मार्गक्रमण करत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प. बंगालच्या मुख्यमत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र खर्गे यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवर शेअर केले आहे. (Mallikarjun Kharge & Mamata Banerjee)

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून पश्चिम बंगालमधून जाणाऱ्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला सुरक्षित मार्ग देण्याची मागणी केली आहे. पं बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत याबाबत अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, असे देखील खर्गे यांनी पत्रात लिहिले आहे. (Mallikarjun Kharge & Mamata Banerjee)

यापूर्वी ममता बॅनर्जी यांच्या राज्यातुन राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा प्रवास सुरू होता. मात्र या यात्रेची माहितीही आपल्याला देण्यात आली नसल्याचे ममता बॅनर्जीं म्हणाल्या. तरत्यावर तिथे यात्रेचा दुसरा टप्पाही होणार आहे. पहिला टप्पा फार छोटा होतादुसरा टप्पात त्यांना बोलावले जाईलअसा मुलामा कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आला. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बॅनर्जी यांना हे पत्र लिहिले आहे. 

बिहारमधील राजकीय उलथापालतीवर काँग्रेस अलर्ट मोडवर

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत असलेली भारत जोडो न्याय यात्रा सध्या पं. बंगालमध्ये आहे. येथील दार्जिलिंगमध्ये पोलिसांनी राहुल गांधींच्या जाहीर सभेला परवानगी नाकारली आहे. ही सभा उद्या रविवारी २८ जानेवारीला होणार आहे. बिहारमधील राजकीय उलथापालथीमुले काँग्रेसच्या अडचणीही वाढल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या अटकळींदरम्यान, काँग्रेसने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची बिहारमधील भारत जोडो न्याय यात्रेचे समन्वयक आणि इतर राजकीय क्रियाकलापांसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यासंदर्भातील पत्र जारी केले आहे. (Mallikarjun Kharge & Mamata Banerjee)

हेही वाचा:

Back to top button