दिल्लीत इमारतीला भीषण आग; ९ महिन्यांच्या बाळासह चौघांचा मृत्यू | पुढारी

दिल्लीत इमारतीला भीषण आग; ९ महिन्यांच्या बाळासह चौघांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील शाहदरा भागात शुक्रवारी एका बहुमजली इमारतीच्या तळमजल्याला भीषण आग लागल्याने नऊ महिन्यांच्या बाळासह चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. काल संध्याकाळी ५:२२ वाजता ही घटना घडली. या प्रकरणाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. जखमींना उपचारासाठी जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मॉडर्न शाहदरा येथील रामनगर भागातील गल्ली क्रमांक २६ मध्ये असलेल्या चार मजली इमारतीत शुक्रवारी सायंकाळी भीषण आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. सायंकाळी ६.५५ पर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. इमारतीच्या तळमजल्यावर ठेवलेले रबर मटेरियल आणि रबर कटिंग मशिनला लागलेल्या आगीमुळे ही घटना घडली. या दुर्घटनेत एका लहान मुलासह एकूण सहा जण इमारतीत अडकले होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. यानंतर सर्वांना उपचारासाठी जीटीबी रुग्णालयात नेण्यात आले. त्यातील लहान मुलासह चार जणांचा मृत्यू झाला. तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : 

Back to top button