पुढारी ऑनलाईन डेस्क: आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभर उत्साह साजरा होत आहे. दरम्यान, तेलंगणाlदेखील प्रजासत्ताक साजरा करण्यात आला. हैद्राबाद येथील तेलंगणा भवनात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम सुरू होता. याचवेळी तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री महमूद अली हे अचानक बेशुद्ध पडले. यानंतर उपस्थित लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा व्हिडिओ एएनआयने शेअर केला आहे. (Telangana Former Deputy CM)
तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री महमूद अली हे के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाचे नेते आहेत. ते 2014 ते 2018 पर्यंत तेलंगणाचे उपमुख्यमंत्री होते. केसीआरच्या दुसऱ्या कार्यकाळात महमूद अली यांना राज्याचे गृह मंत्रालय, तुरुंग आणि अग्निशमन सेवा ही खाती देण्यात आली होती.
महमूद अली यांचा वादांशीही दीर्घकाळ संबंध होता. तेलंगणाचे गृहमंत्री असताना त्यांनी महिलांबाबत वक्तव्य केले होते. यावरून बराच वाद झाला होता. महम्मूद म्हणाले होते की, लहान कपडे परिधान केल्याने महिलांना त्रास होऊ शकतो. 2023 मध्ये, जेव्हा महमूद अली पशुसंवर्धन मंत्री तलसानी श्रीनिवास यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंचावर पोहोचले तेव्हा त्यांनी वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्याला चापट मारली कारण त्यांच्या हातात पुष्पगुच्छ नव्हता.