माझ्‍यावर गुन्‍हा दाखल करा : राहुल गांधींचे आसाम पोलिसांना आव्‍हान | पुढारी

माझ्‍यावर गुन्‍हा दाखल करा : राहुल गांधींचे आसाम पोलिसांना आव्‍हान

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आसामचे मुख्‍यमंत्री हिमंता सरमा हे देशातील भारतातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत. त्‍यांना वाटत असेल की, माझ्‍यावर गुन्‍हे दाखल झाले तर मी घाबरेन;पण मला भाजप आणि राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ दोघेही एकत्र येवून घाबरवू शकत नाही. माझ्‍यावर आणखी २५ गुन्‍हे दाखल करा, मला काहीच पडत नाही, अशा शब्‍दांमध्‍ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आसाम पोलिसांना आज (दि.२४) आव्‍हान दिले. आसाममधील बारपेटा येथे भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ते बोलत होते. ( Bharat Jodo Nyay Yatra in Assam )

Bharat Jodo Nyay Yatra in Assam :  जमेल तेवढे गुन्‍हे दाखल करा…

गुवाहाटी पोलिसांनी मंगळवार २३ जानेवारी रोजी राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांवर जमावाला भडकवल्‍याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हा संदर्भ देत यावेळी राहुल गांधी म्‍हणाले की, पोलिसात गुन्‍हा दाखल झाल्‍यानंतर आम्‍ही घाबरु असे आसामच्‍या मुख्यमंत्र्यांना वाटले असेल. माझ्‍यावर आणखी २५ गुन्हे दाखल करावेत. जमेल तेवढे गुन्‍हे दाखल करा, मला काहीच फरक फरक पडत नाही. मीा कोणाला घाबरत नाहीत. ( Bharat Jodo Nyay Yatra in Assam )

आसामचे मुख्‍यमंत्री सरमा यांच्‍यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हृदय द्वेषाने भरलेले आहे. भाजप आणि संघाला आसामची भाषा, संस्कृती आणि इतिहास पुसून टाकायचा आहे. संघाला आपलं मुख्‍यालय नागपूरमधून (आरएसएस मुख्यालय) आसामला हलवायचे आहे; परंतु काँग्रेस आणि आसामची जनता त्यांना तसे करू देणार नाही, असेही राहुल गांधी म्‍हणाले.
आसामचे मुख्‍यमंत्री सरमा यांनी काझीरंगा नॅशनल पार्कमध्येही जमीन घेतली आहे, असा आरोपही राहुल गांधींनी केला. राहुल यांनी मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रा सुरूवात केली. आज या यात्रेचा ११ दिवस असून, ते आसाममधील बारपेटा येथे आहेत. या यात्रेच्‍या माध्‍यमातून 6200 किलोमीटरचा प्रवासात राहुल गांधी 14 राज्यांमधून करणार आहेत.

हेही वाचा : 

 

 

Back to top button