Delhi Liquor Case : केजरीवालांचे 'ईडी'ला पत्र; म्हणाले, " मला अटक करणे..." | पुढारी

Delhi Liquor Case : केजरीवालांचे 'ईडी'ला पत्र; म्हणाले, " मला अटक करणे..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचार करु नये यासाठी  मला अटक करणे हा भाजपचा उद्देश आहे, असा दावा करणारे पत्र दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (दि.१८) अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी)  लिहिले आहे.

Delhi Liquor Case : भ्रष्ट नेते भाजपमध्ये जातात

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अबकारी घोटाळ्याप्रकरणी चौथ्या समन्सवर ईडीला उत्तर पाठवले आहे. मला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखण्‍यासाठी मला अटक हा भाजपचा उद्देश आहे, असे केजरीवाल यांनी म्‍हटले आहे. भ्रष्ट नेते भाजपमध्ये जातात, त्यांची प्रकरणे बंद होतात. आम्ही भ्रष्टाचार केलेला नाही, आमचा एकही नेता भाजपमध्ये जाणार नाही,असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

   ईडीने १८ जानेवारीला हजर राहण्याबाबत केजरीवालांना समन्स पाठवले होते. यापूर्वी ईडीच्या तीन समन्सवर केजरीवाल यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तिन्‍हीवेळा ईडीला लेखी उत्तर पाठवले आणि समन्स बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. ईडीच्या समन्समध्ये आपल्याला समन्स बजावण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही, असे त्यांनी म्हटले हाेते.

हेही वाचा 

Back to top button