Rahul Gandhi On Ram Pranpratistha : प्राणप्रतिष्ठा सोहळा केवळ नरेंद्र मोदींचा राजकीय सोहळा : राहुल गांधी

Rahul Gandhi On Ram Pranpratistha
Rahul Gandhi On Ram Pranpratistha
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: देशासह जगभरात सध्या अयोध्येत हाेत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची चर्चा सुरू आहे. या सोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांसह सेलिब्रेटी, खेळाडू, कलाकार आणि परदेशी पाहुणे उपस्थित राहणार आहेत. मात्र या सोहळ्याला काँग्रस पक्षाने उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी 'भारत जोडो न्याय यात्रे'दरम्यान या सोहळ्याला 'हा केवळ राजकीय नरेंद्र मोदींचा सोहळा' असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चा आज (दि.१६) तिसरा दिवस आहे. यात्रा आज नागालँडमधील कोहिमा येथे असून, माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदींसह भाजपवर टीका केली.  (Rahul Gandhi On Ram Pranpratistha)

राहुल गांधी म्हणाले की, आरएसएस आणि भाजपने 22 जानेवारीच्या सोहळ्याला पूर्णपणे राजकीय नरेंद्र मोदींचा सोहळा बनवला आहे. हा आरएसएस अणि भाजपचा सोहळा आहे. त्यामुळेच मला वाटते की, काँग्रेस अध्यक्षांनी कार्यक्रमाला जाणार नसल्याचे सांगितले. तसेच आम्ही सर्व धर्मांसाठी, सर्व पद्धतींसाठी खुले आहोत, असेही राहुल गांधी म्हणाले. (Rahul Gandhi On Ram Pranpratistha)

भारत जोडो न्याय यात्रा ही विचारधारेची यात्रा; राहुल गांधी

भारत जोडो न्याय यात्रा ही विचारधारेची यात्रा आहे. सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय हे मुद्दे मांडणे त्याचे ध्येय आहे. आम्ही मणिपूरपासून सुरुवात केली, त्यामागे एक विचार होता कारण मणिपूरवर घोर अन्याय झाला आहे.  प्रथमच एका भारतीय राज्यात अनेक महिने हिंसाचार सुरू होता. पंतप्रधान आणि भाजपच्या नेत्‍यांनी या राज्‍याला भेटही दिली नाही. पंतप्रधानांनी नागालँडच्या जनतेलाही वचनबद्ध केले होते; परंतु त्यांनी त्यांची वचनबद्धता पूर्ण केली आहे. काँग्रेस आणि त्यांच्या शिष्टमंडळाने मणिपूरला भेट देत, येथील जनतेच्या समस्या समजून घेतल्या, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news