Ayodhya Ram Mandir : अयोध्येत १०८ फुटांची अगरबत्ती प्रज्वलित | पुढारी

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत १०८ फुटांची अगरबत्ती प्रज्वलित

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातहून आलेली १०८ फुटांची अगरबत्ती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दासजी महाराज यांच्या उपस्थितीत प्रज्वलित करण्यात आली. ३६११ किलोची ही जगातील सर्वात मोठी अगरबत्ती असून तिची नोंद वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियामध्ये झाली आहे.

अयोध्येतील भव्य राम मंदिरात लवकरच रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्त अवघ्या देशातील लोकांची स्थिती ‘रामरंगी रंगले’ अशी झाली आहे. अनेकांनी या सोहळ्यासाठी आपापले योगदान दिले आहे. त्यामध्ये गुजरातमधील विहाभाई करशनभाई भारवाड यांचाही समावेश आहे. त्यांनी तब्बल १०८ फूट लांबीची अगरबत्ती बनवली आहे.

गुजरातच्या बडोदा जिल्ह्यातील तरसाली शहरात भारवाड राहतात. त्यांनी बनवलेल्या या अगरबत्तीचे वजन सुमारे ३६११ किलो आहे. यामध्ये गुग्गुळ पावडर, कोकोनट पावडर, बारवी, हवन सामग्री पावडर, विविध औषधी फुले व देशी गीर गायीचे शेण तसेच तूप वापरले आहे. ही अगरबत्ती अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी मंदिर येथे ट्रॉलरने आणण्यात आली. आजपासून रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरूवात झाली असून अगरबत्ती प्रज्वलित करण्यात आली. वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाकडून त्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरवण्यात आले.

हेही वाचा : 

Back to top button