पुढारी ऑनलाईन डेस्क : पोंगल हा सण 'एक भारत – श्रेष्ठ भारत' या राष्ट्रीय भावनेचे प्रतिबिंब दाखवतो. पूर्वी काशी-तमिळ संगम आणि सौराष्ट्र तमिळ संगमम यांची अत्यंत महत्त्वाची परंपरा सुरू झाली आहे आणि त्यांच्यातही हे चैतन्य दिसून येते. २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी ही एकतेची भावना सर्वात मोठी शक्ती आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदी आज (दि.१४) दिल्ली येथे केंद्रीय माहिती प्रसारण आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या निवासस्थानी आयोजित पोंगल उत्सवात सहभागी झाले होते. या समारंभात पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन याही उपस्थित होत्या.
यावेळी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "पोंगलच्या दिवशी तामिळनाडूतील प्रत्येक घरातून पोंगलची धारा वाहते. अशाच प्रकारे तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधानाचा प्रवाह वाहत राहो हीच सदिच्छा. संत तिरुवर यांनी म्हटले आहे की, चांगले पीक, शिक्षित लोक आणि प्रामाणिक व्यापारी मिळून राष्ट्र घडवतात. त्यांनी राजकारण्यांचा उल्लेख केलेला नाही. पोंगल सणाच्या वेळी देवाच्या चरणी नवीन पिके अर्पण करण्याची परंपरा आहे. या संपूर्ण उत्सवाच्या परंपरेच्या केंद्रस्थानी आपले शेतकरी आहेत. भारतातील प्रत्येक सण हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे गाव, शेती आणि पिकांशी संबंधित असतो. देशाने काल लोहरीचा सण साजरा केला. काही लोक आज मकर संक्रांत साजरी करत आहेत आणि काही लोक उद्या साजरी करतील, माघ बिहूही येत आहे, या सणांसाठी मी देशवासियांना शुभेच्छा देतो."
हेही वाचा :