‘अत्‍यंत आक्षेपार्ह…’ : पाकव्‍याप्‍त काश्‍मीरला ब्रिटनच्‍या राजदूतांची भेट, भारताकडून तीव्र निषेध | पुढारी

'अत्‍यंत आक्षेपार्ह...' : पाकव्‍याप्‍त काश्‍मीरला ब्रिटनच्‍या राजदूतांची भेट, भारताकडून तीव्र निषेध

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानमधील ब्रिटनच्‍या राजदूत जेन मॅरियट यांनी पाकव्याप्त काश्मीर (POK) येथे भेट दिली. या भेटीवर आज (दि.१३) भारत सरकारने तीव्र निषेध व्‍यक्‍त केला आहे. “हे अत्‍यंत आक्षेपार्ह आणि भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन करणारे कृत्य आहे,” असे भारताने स्‍पष्‍ट केले आहे. ( India protests POK visit by British envoy to Pakistan.)

जेन मॅरियट यांनी पाकव्याप्त काश्मीरला भेट दिल्यानंतर X वर काही फोटो शेअर केले होते. ७० टक्के ब्रिटिश पाकिस्तानी मूळ मीरपूर येथील असल्याचे सांगितले त्‍यांनी या भेटीत म्‍हटले होते. मॅरियट यांच्‍या पाकव्याप्त काश्मीरला दिलेल्‍या भेटीवर परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी भारतातील ब्रिटीश उच्चायुक्तांकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. जम्मू -काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि राहतील, असेही परराष्‍ट्र मंत्रालयाने निवेदनात म्‍हटले आहे. ( India protests POK visit by British envoy to Pakistan.)

ऑक्टोबर 2023 मध्ये पाकिस्तानमधील अमेरिकेचे राजदूत डेव्हिड ब्लोम यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानला भेट दिली होती. त्यानंतरही केंद्र सरकारने हा मुद्दा अमेरिकन अधिकाऱ्यांसमोर मांडला होता. जम्मू-काश्मीरचा संपूर्ण प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचा पुनरुच्चार केला होता.

हेही वाचा :

 

Back to top button