मोठी बातमी : ‘INDIA’ आघाडीच्‍या अध्‍यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे

मोठी बातमी : ‘INDIA’ आघाडीच्‍या अध्‍यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  विरोधी पक्षांच्‍या  'इंडिया' आघाडीची आज  (दि.13)  बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची आघाडीच्‍या अध्‍यक्षपदी निवड करण्‍यात आली आहे. तत्‍पूर्वी संयुक्‍त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीचे निमंत्रक पदाचा प्रस्‍ताव नाकारला असल्‍याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.  (Congress Chief Mallikarjun Kharge To Lead Opposition Bloc INDIA )

आघाडीचे अध्‍यक्षआणि निमंत्रक पदाच्‍या निवडीसाठी  इंडिया आघाडीची बैठक आज आभासी ( व्हर्च्युअल) स्वरूपात झाली. या बैठकीला मल्लिकार्जुन खर्गे, ,नितीश कुमार, एमके स्टॅलिन, शरद पवार, डी राजा,ओमर अब्दुल्ला, राहुल गांधी, सीताराम येचुरी, लालू यादव-तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, डी राजा, शरद पवार उपस्थित होते. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आणि  शिवसेना ठाकरे नेते उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्‍थित नव्‍हते.

 बैठकीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांची निमंत्रकपदी, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची अध्यक्षपदी निवडीवर चर्चा झाली. यावेळी नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीचे निमंत्रक पदाचा प्रस्‍ताव नाकारले. अखेर  मल्लिकार्जुन खर्गे यांची इंडिया आघाडीचे अध्‍यक्ष म्‍हणून निवड झाली.

 INDIA Bloc : नितीशकुमार 'अस्वस्थ' असल्याची चर्चा

सर्व विरोधी पक्षांची इंडिया आघाडी तयार झाल्यापासूनच नितीशकुमार यांचे नाव  निमंत्रक पदासाठी आघाडीवर होते. परंतु, आघाडीच्या पाटणा, बंगळूर, मुंबई आणि दिल्ली अशा चार बैठका होऊनही समन्वयक नियुक्ती झाली नव्हती. विशेष म्हणजे, दिल्लीतील बैठकीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींनी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांचे नाव पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्याचा प्रस्ताव दिला हाेता. मात्र, पदाचा उल्लेखही न झाल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार अस्वस्थ असल्याची चर्चा रंगली होती. या सार्‍या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी आघाडी इंडियाची शनिवारी होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात हाेती.

याआधी इंडिया आघाडीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्‍या नावाचा पंतप्रधानपदासाठी प्रस्ताव ठेवला होता. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news