Swachh Survekshan 2024 | स्वच्छ सर्वेक्षण यादीत महाराष्ट्रातील ‘नवी मुंबई’ शहर तिसऱ्या स्थानी

Swachh Survekshan 2024
Swachh Survekshan 2024
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जाते. या अंतर्गत घेण्यात येत असलेल्या स्पर्धेत भारतातील स्वच्छ शहरांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराने तिसरे स्थान मिळवले. तर इंदूर शहराने सलग सातव्यांदा अव्वल स्थान मिळवले आहे. या बरोबरच तिसऱ्या स्थानी डायमंड शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातमधील सूरत शहराचा समावेश आहे. या संदर्भातील वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. (Swachh Survekshan 2024)

राष्ट्रपाती द्रौपदी मुर्मू यांनी जाहीर केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण निकाल २०२३ नुसार, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सासवड शहर नगरपरिषदेला देखील स्वच्छता सर्वेक्षण यादीत पहिले स्थान मिळाले आहे. या सर्व शहरांची लोकसंख्या ही १ लाखांहून कमी आहे. तसेच छत्तीसगडमधील पटणा आणि महाराष्ट्रातील लोणावळा या शहर नगरपरिषदेचा देखील स्वच्छता यादीत अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळाले आहे. (Swachh Survekshan 2024)

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण निकाल २०२३ मध्ये भारतातील विशाखापट्टणम, भोपाळ, विजयवाडा, नवी दिल्ली नगर परिषद, तिरूपती, हैद्राबाद आणि पुण्याचा देखील समावेश आहे, असे वृत्तात म्हटले आहे. (Swachh Survekshan 2024)

2023 मध्ये भारतातील शीर्ष 10 स्वच्छ शहरे

1. इंदूर, म.प्र
2. सुरत, गुजरात
3. नवी मुंबई, महाराष्ट्र
4. विझाग, आंध्र प्रदेश
5. भोपाळ, खासदार
6. विजयवाडा, आंध्र प्रदेश
7. नवी दिल्ली
8. तिरुपती, आंध्र प्रदेश
9. हैदराबाद, तेलंगणा
10. पुणे, महाराष्ट्र

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news