Andaman Earthquake : अंदमान-निकोबार द्वीपवर ४.१ रिश्टर स्केल भूकंप

Andaman Islands Earthquake
Andaman Islands Earthquake

पुढारी ऑनलाईन डेस्क : बुधवारी (१० जानेवारी) सकाळी ७ वाजून ५३ मिनिटांनी अंदमान बेटावर भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भारताच्या पश्चिमेला असलेल्या अंदमान बेटांवर ४.१ रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली आहे. (Andaman Earthquake) नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने ही माहिती दिली आहे. एनसीएसने सांगितले की, अंदमान बेटावर सकाळी ७.५३ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीएसनुसार, १० जानेवारी सका‍ळी ७ वाजून ५३ मिनिटांनी अंदमान द्वीप, भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. (Andaman Earthquake)

संबंधित बातम्या –

एनसीएसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे भूकंपाच्या केंद्राची खोली १० किमी होती. एनसीएसनुसार, १० जानेवारी रोजी सकाळी ७ वाजून ५३ मिनिटांनी अंदमान बेट, भारत येथे भूकंपाचे धक्के जाणवले. या आठवड्याच्या सुरुवातीला इंडोनेशियाच्या तलाउड बेटांवर ६.७ तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. एनसीएसच्या माहितीनुसार, मंगळवारी ९ जानेवारी रोजी मध्यरात्री ८० किमी खोलीवर भूकंप झाला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news