Ram Mandir Inauguration : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर! ‘या’ राज्य सरकारचा मोठा निर्णय | पुढारी

Ram Mandir Inauguration : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर! ‘या’ राज्य सरकारचा मोठा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क: आयोध्येत सोमवारी २२ जानेवरीला होत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह देशभर दिसून येत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेश सरकारने शैक्षणिक संस्थांसंदर्भातील महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माध्यमांशी बोलताना आज (दि.९) दिली. (Ram Mandir Inauguration)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व शैक्षणिक संस्थांना सोमवारी २२ जानेवारीला सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान या दिवशी राज्यात दारूची दुकाने बंद राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. (Ram Mandir Inauguration)

सध्याच्या काळात भगवान रामलल्लाच्या प्रस्तावित प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार्‍या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी केली जात आहे. यानुसार तीन महिन्यांत सुमारे एक कोटी नागरिकांना अयेाध्येत आणण्याचे ध्येय ठेवले आहे. (Ram Mandir Inauguration)

हेही वाचा:

Back to top button