पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्‍चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते सत्यन चौधरी यांची आज (दि.७) अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पश्चिम बंगालमधील बहरामपूरमध्ये ही घटना घडली.

तृणमूल काँग्रेसच्‍या स्‍थानिक नेत्‍यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, हल्‍लेखोर दुचाकीवरुन आले. त्‍यांनी सत्यन चौधरींवर जवळून गोळीबार केला. चौधरी हे पूर्वी काँग्रेसमध्‍ये होते. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांचे निकटवर्ती अशी त्‍यांची ओळख होती. मात्र नंतर त्‍यांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्‍ये प्रवेश केला होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news