Liberian ship hijack | सोमालियाच्या किनाऱ्याजवळ १५ भारतीय असलेले जहाज हायजॅक, नौदलाची माहिती | पुढारी

Liberian ship hijack | सोमालियाच्या किनाऱ्याजवळ १५ भारतीय असलेले जहाज हायजॅक, नौदलाची माहिती

पुढारी ऑनलाईन : सोमालिया किनाऱ्याजवळ एक ‘एमव्ही लीला नारफोक’ हे जहाज हायजॅक करण्यात आले आहे. हे जहाज हायजॅक झाल्याची माहिती भारतीय नौदलाला काल संध्याकाळी मिळाली होती. त्यानंतर भारतीय नौदल या जहाजावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सोमालियाच्या किनार्‍याजवळ हायजॅक करण्यात आलेल्या लायबेरियन ध्वज असलेल्या जहाजावर १५ भारतीय क्रू सदस्य आहेत, असे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. (Liberian ship hijack)

भारतीय नौदलाची विमाने जहाजावर लक्ष ठेवून आहेत आणि क्रूशी संवाद प्रस्थापित केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस चेन्नई हायजॅक झालेल्या जहाजाच्या दिशेने जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की, “या जहाजाने यूकेएमटीओ (युनायटेड किंगडम मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स) पोर्टलवर एक मेसेज पाठवला होता, ज्यामध्ये ४ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी सुमारे पाच ते सहा अज्ञात सशस्त्र व्यक्तींनी जहाजावर प्रवेश केला आहे.”

अरबी समुद्रात अज्ञात हल्लेखोरांनी माल्टीज ध्वज असलेले व्यापारी जहाज जप्त केले होते. आता पुन्हा चाचेगिरीची घटना समोर आली आहे. भारतीय नौदलाने चाच्यांनी हायजॅक केलेल्या मालवाहू जहाजावरील १८ क्रू मेंबर्सपैकी एक बल्गेरियन नागरिकाची सुखरूप सुटका केली होती. आयएनएस कोची या आघाडीच्या जहाजाने खलाशांना बाहेर काढले होते.

२००८ आणि २०१३ दरम्यान या प्रदेशात समुद्री चाच्यांचे हल्ले वाढले होते. पण त्यानंतर भारतीय नौदलासह बहुराष्ट्रीय सागरी कार्य दलाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे त्यात सातत्याने घट झाली होती.

हे ही वाचा :

 

Back to top button