आव्हाडांच्या वक्तव्यावर मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची प्रतिक्रिया

आव्हाडांच्या वक्तव्यावर मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'श्री राम मांसाहारी होते' असं वक्तव्य केलं आहे. त्यानंतर नवा वाद निर्माण झाला असून भाजपा आक्रमक झाली आहे. आव्हाडांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर राम मंदिराचे मुख्य पूजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आमचा देव नेहमीच शाकाहारी होता,' असे आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटले आहे.

"राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड जे बोलत आहेत ते पूर्णपणे खोटे आहे. आपल्या धर्मग्रंथात कुठेही असे लिहिलेले नाही. प्रभू राम वनवासात शाकाहारी जेवण करायचे, ते फळे खायचे असे लिहिले आहे. आव्हाड सारख्या लबाड माणसाला आपल्या प्रभू रामाचा अपमान करण्याचा अधिकार नाही. आमचा देव नेहमीच शाकाहारी होता. आपल्या प्रभू रामाचा अपमान करण्यासाठी असे अपमानास्पद शब्द बोलले जात आहेत."

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

"भगवान श्री राम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते. १४ वर्षांपासून जंगलात राहणारा माणूस शाकाहारी अन्न शोधायला कुठे जाणार? बरोबर आहे की नाही?" असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. शिर्डी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news