Ayodhya Ram Mandir : राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे अमेरिकेतील मंदिरांमध्ये थेट प्रक्षेपण | पुढारी

Ayodhya Ram Mandir : राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे अमेरिकेतील मंदिरांमध्ये थेट प्रक्षेपण

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्यामधील राममंदिराच्या भव्य उद्घाटनानिमित्त संपूर्ण युनायटेड स्टेट्समधील मंदिरे उत्तर अमेरिकेत आठवडाभर चालणार्‍या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये अमेरिकेतील तब्बल ११०० मंदिरांचा समावेश आहे. येत्या २२ जानेवारीला हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती मंदिरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. (Ayodhya Ram Mandir)

हिंदू मंदिर एम्पॉवरमेंट कौन्सिल (एचएमईसी) ही अमेरिकेतील ११०० हून अधिक हिंदू मंदिरांची सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेच्या प्रतिनिधीचा हवाला देत ऑर्गनाझर व्हॉइस ऑफ दि नेशन या वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. एचएमईसीचे प्रवक्ते तेजल शाह यांनी याबाबत बोलताना सांगितले की, शतकानुशतकांच्या अपेक्षा आणि संघर्षानंतर बहुप्रतिक्षित स्वप्न मंदिर साकार होत आहे. अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांतील लोकांमध्ये देखील राम मंदिराविषयी आतुरता लागून राहिली आहे. मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची भक्त अतुरतेने वाट पाहत आहेत. भारताबाहेरही भगवान रामांचे त्यांच्या मंदिरात स्वागत करण्यासाठी लोक सज्ज आहेत.

याबाबत शहा पुढे म्हणाले की, अमेरिकेत राहणारे हिंदू समाजाचे लोक अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक त्यांच्या घरी पाच दिवे लावून साजरा करण्याची योजना आखत आहेत. येथील हिंदू समुदायाने यानिमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये विविध शहरांमध्ये कार रॅली काढणे, भव्य उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आणि समुदाय सभा इत्यादींचा समावेश आहे. त्याचबरोबर याठिकाणी राम मंदिरांच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण देखील केले जाणार आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा

Back to top button