Rajasthan Cabinet Expansion : अखेर राजस्‍थान मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, २२ मंत्र्यांनी घेतली शपथ

राजस्‍थानमधील भजनलाल शर्मा सरकारच्‍या पहिल्‍या मंत्रिमंडळाचा विस्ताराला आज झाला. मंत्री पदाची शपथ घेताना  राज्यवर्धन सिंह राठोड.
राजस्‍थानमधील भजनलाल शर्मा सरकारच्‍या पहिल्‍या मंत्रिमंडळाचा विस्ताराला आज झाला. मंत्री पदाची शपथ घेताना  राज्यवर्धन सिंह राठोड.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजस्‍थानमधील भजनलाल शर्मा सरकारच्‍या पहिल्‍या मंत्रिमंडळाचा विस्ताराला आज (दि.३०) मुहूर्त मिळाला. भजनलाल त्‍यांनी मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेतल्‍यानंतर तब्‍बल १८ दिवसानंतर हा विस्‍तार झाला आहे. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी २२ मंत्र्यांना पदाची आणि गाेपनीयतेची शपथ दिली. भजनलाल सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्र्यांशिवाय 22 मंत्र्यांनी शपथ घेतली असून यामध्‍ये 12 कॅबिनेट मंत्री आहेत. तर दहा राज्यमंत्री आहेत. पाच जणांना स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. भजनलाल मंत्रिपरिषदेत करण्यात आलेल्या 22 मंत्र्यांपैकी 16 प्रथमच मंत्री झाले आहेत. तर 25 पैकी 20 प्रथमच मंत्री झाले आहेत.

राजस्‍थान मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री : किरोडीलाल मीना, डॉ. गजेंद्रसिंग खिंवसार, राज्यवर्धन सिंह राठोड, बाबूलाल खराडी, मदन दिलावर, जोगाराम पटेल, सुरेश सिंह रावत, अविनाश गेहलोत, जोरराम कुमावत, हेमंत मीना, कन्हैया लाल चौधरी, सुमित गोदरा.

स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री : संजय शर्मा, गौतम कुमार डीसी, झवरसिंग खरा, सुरेंद्र पाल सिंग टीटी, हिरालाल नगर,

राज्यमंत्री : ओताराम देवासी, मंजू बागमार, डॉ. विजयसिंह चौधरी, कृष्णकुमार बिश्नोई, जवाहरसिंग बेदाम

भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते किरोडीलाल मीना यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. तर वसुंधरा राजे गटातील गजेंद्र सिंह खिंवसर यांनी दुसऱ्या क्रमाकांवर शपथ घेतली. गजेंद्र सिंह हे वसुंधरा राजे यांच्या दोन्ही सरकारमध्ये मंत्री राहिले होते. राजस्‍थानमधील राजपूत समाजाचा चेहरा म्हणूनही त्याची ओळख आहे.

माजी केंद्रीय मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी तिसऱ्या क्रमांकावर शपथ घेतली. ते केंद्रात मंत्री राहिले आहेत. दोनवेळा खासदारही होते. भाजपने त्यांना विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली होती. ते पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

बाबूलाल खराडी हे झाडोलचे आमदार आहेत. आदिवासी भागातील तळागाळातील नेते म्हणून त्यांची गणना होते. खराडी लोक अजूनही मातीच्‍या घरात राहतात. मागील विधानसभेत सर्वोत्तम आमदार म्हणून त्‍यांना गौरविण्‍यात आले होते.

भजनलाल सरकारमध्ये दलित समाजचे नेते मदन दिलावर यांचा समावेश करण्यात आला आहे. भैरवसिंह शेखावत सरकार आणि वसुंधरा राजे सरकारमध्ये त्‍यांनी मंत्रीपद भूषवले होते. उच्च न्यायालयातील वकील जोगाराम पटेल यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

सुरेंद्र पाल सिंह टीटी हे श्रीकरणपूरमधून भाजपचे उमेदवार आहेत आणि ते आता स्वतंत्र प्रभार घेऊन राज्यमंत्री झाले आहेत. श्रीकरणपूर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेसचे उमेदवार गुरमीत कुन्नर यांच्या निधनानंतर रद्द करण्यात आली असून, या जागेवर ५ जानेवारीला मतदान होणार आहे.

पुष्करमधून तिसऱ्यांदा आमदार झालेले सुरेश सिंह रावत यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. रावत यांचीही संघाची निवड मानली जात आहे.यापूर्वी ते राज्यमंत्रिपदासह संसदीय सचिव झाले आहेत.

जैतरणचे आमदार अविनाश गेहलोत यांनाही भजनलाल सरकारमध्ये मंत्री करण्यात आले आहे. ते दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. ते तळागाळातील नेते मानले जातात. संघटनांमध्ये त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत. त्यांना हायकमांडची निवड मानली जाते.
झोरा राम कुमावत हे कुशल राजकारणी मानले जातात. सुमेरपूर विधानसभेतून ते विजयी झाले. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. 2018 मध्ये मोठा विजय मिळवलेले जोरा राम यावेळीही मोठ्या मतांनी विजयी झाले आहेत.

हेमंत मीणा प्रतापगड विधानसभेचे आमदार आहेत. माजी मंत्री नंदलाल मीणा यांचे ते पुत्र आहेत. नंदलाल मीणा हे वसुंधरा राजे यांचे समर्थक आहेत. हेमंत मीणा यांचा मंत्रिमंडळात समावेश करून भाजपने सर्वांनाच चकित केले. वास्तविक हेमंत मीना पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. भजनलाल मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news