Arvind Kejriwal: “सबका मंगल हो”; 10 दिवसाच्या विपश्यनेनंतर मुख्यमंत्री केजरीवाल पुन्हा सेवेत | पुढारी

Arvind Kejriwal: "सबका मंगल हो"; 10 दिवसाच्या विपश्यनेनंतर मुख्यमंत्री केजरीवाल पुन्हा सेवेत

पुढारी ऑनलाईन डेस्क: दहा दिवसांच्या विपश्यनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री, आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल पुन्हा जनतेच्या सेवेत रूजू होत आहेत, असे त्यांनी आज (दि.३०) त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून सांगितले आहे. (Arvind Kejriwal)

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट केली आहे. त्यांनी, “10 दिवसांच्या विपश्यना ध्यानानंतर आज परतलो. ही साधना अपार शांती देते. आजपासून पुन्हा नव्या ऊर्जेने जनतेची सेवेत रूजू होत असल्याचे सांगितले आहे. तसेच सबका मंगल हो!” असेही त्यांनी म्हटले आहे. (Arvind Kejriwal)

यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पंजाबच्या होशियारपूर येथील विपश्यना ध्यान केंद्रातून निघाल्याचे वृत्त एएनआयने दिले होते. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मंगळवार 19 डिसेंबर ते आज शनिवार 30 डिसेंबर दरम्यान विपश्यना ध्यानावर होते, असेही म्हटले आहे. (Arvind Kejriwal)

केजरीवाल दरवर्षी विपश्यनेसाठी जातात. यावर्षीही त्यांनी १० दिवसाचा विपश्यना कालावधी पूर्ण करत ते १० दिवस राजकारणापासून लांब राहिले आहेत. यापूर्वी केजरीवाल २०२१ मध्ये जयपूरमध्ये विपश्यनेसाठी गेले होते, असेही सांगण्यात आले आहे. ‘विपश्यना’ ही एक प्राचीन भारतीय ध्यान पद्धत आहे. ज्यामध्ये सहभागी लोक काही काळ प्रसार माध्यम किंवा टीव्ही , फोन या सगळ्यांच माध्यमांपासून दूर राहतात. तसेच या काळात व्यक्तीला संवाद किंवा सिग्नलद्वारे कोणाशीही बोलता येता नाही.

हेही वाचा:

Back to top button