Nitish Kumar : नितीशकुमार अडकले चक्रव्यूहात | पुढारी

Nitish Kumar : नितीशकुमार अडकले चक्रव्यूहात

पाटणा, वृत्तसंस्था : संयुक्त जनता दलाचे (जदयू) सर्वेेसर्वा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे पक्षांतर्गत संघर्षामुळे कमालीचे अस्वस्थ असल्याचे बोलले जाते. ते भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) सामील होण्याची चर्चा सुरू आहे. (Nitish Kumar)

ललनसिंग यांचा सवतासुभा

जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललनसिंग यांनी पक्षात सवतासुभा केल्याची चर्चा आहे. बहुतांश आमदारांना सोबत घेऊन ते परस्पर बैठका घेत असल्याने नितीशकुमार नाराज असल्याचे समजते. (Nitish Kumar)

खर्गेंच्या नावामुळेही नाराज

नितीशकुमार हे इंडिया आघाडीचे निमंत्रक आहेत. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आणले जात असल्यानेही ते नाराज असल्याचे समजते.

लालूंचे पुत्रप्रेम

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमारांना चक्रव्यूहात अडकवल्याचा आरोप भाजप नेते गिरीराज सिंह यांनी केला आहे. तेजस्वी यांना मुख्यमंत्री करण्याचा लालूंचा इरादा असून नितीशकुमारांचा त्यास विरोध असल्याचेही सर्वश्रुत आहे.

जागावाटप

लोकसभेत जदयू आणि राजद प्रत्येकी 17 जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसला 4 आणि डाव्यांना 2 जागांचा प्रस्ताव इंडिया आघाडीतून देण्यात आला आहे.

रालोआ प्रवेशाचीही चर्चा

पक्षांतर्गत धुसफुसीमुळे नितीशकुमार रालोआमध्ये जाण्याच्या मानसिकतेत असल्याचेही वृत्त आहे. नितीशकुमार पूर्वी भाजपच्या आघाडीतील मित्र पक्ष होते. भाजपसोबत आघाडी करून त्यांनी मुख्यमंत्रिपदही भूषविले आहे. इंडिया आघाडीतील महत्त्व कमी झाल्यास अथवा जागावाटपाच्या मुद्द्यावर बोलणी फिसकटल्यास ते पुन्हा एनडीएच्या तंबूत दाखल होण्याबाबतही तर्कवितर्क सुरू आहेत. नितीशकुमारांनी मात्र रालोआत जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

Back to top button