फुटीरवाद्यांना दणका..! मसरत आलमच्या ‘मुस्लिम लीग’वर बंदी | पुढारी

फुटीरवाद्यांना दणका..! मसरत आलमच्या 'मुस्लिम लीग'वर बंदी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर (मसरत आलम गट) या फुटीरतावादी संघटनेवर बंदी घातली आहे. मसरल आलम ( Masarat Alam ) याच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीग बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी  सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर)वर ही माहिती दिली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची X वर पोस्ट

गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटरवर पोस्ट केले की, “मुस्लिम लीग जम्मू काश्मीर (मसरत आलम गट)/MLJK-MA ही UAPA अंतर्गत ‘बेकायदेशीर संघटना’ म्हणून घोषित करण्यात आली आहे. ही संघटना आणि या संघटनेचे सदस्य जम्मू आणि काश्मीरमध्ये देशविरोधी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत. हे सर्वजण दहशतवादी कारवायांचे समर्थन करत आहेत.  तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.”

कोण आहे  Masarat Alam ?

मसरत आलम भट्ट गेल्या चार वर्षांपासून दिल्लीच्या तिहार कारागृहात आहे. राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने ( एनआयए) काश्मिरी कट्टरपंथी फुटीरतावादी गट ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सचा अध्यक्ष मसरत आलम यांच्यावरही दहशतवादी निधीसाठी गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच त्याला 2008 आणि 2010 मध्ये काश्मीर खोऱ्यातील कथित भूमिकेसाठी अटक करण्यात आली होती. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलमवर 27 गुन्हे दाखल आहेत.

 

हेही वाचा : 

 

Back to top button