INS Imphal : INS इंफाळ भारतीय नौदलात दाखल | पुढारी

INS Imphal : INS इंफाळ भारतीय नौदलात दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंद महासागरात चीनच्या वाढत्या घुसखोरी दरम्यान भारतीय नौदलाच्या सागरी क्षमतेला चालना देण्यासाठी आज (दि.२६) भारतीय नौदलात INS इंफाळ दाखल झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे आयोजित समारंभात ही युद्धनौका सशस्त्र दलात दाखल करण्यात आली. ब्रह्मोस क्षेपणास्त्र ९० अंशात फिरून हल्ला करू शकते. जाणून घेऊया ‘INS इंफाळ’बद्दलच्या खास गोष्टी. (INS Imphal)

INS Imphal : ईशान्येतील शहराचे प्रथमच नाव

INS इंफाळ या युद्धनौकेला राष्ट्रपतींनी १६ एप्रिल २०१९ रोजी मंजुरी दिली होती.  बंदर आणि समुद्रात चाचणी घेतल्यानंतर  २० ऑक्टोबर २०२३ रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली होती.  इम्फाळ ही युद्धनौका अशी पहिली युद्धनौका आहे जिला ईशान्येतील शहराचे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व आणि समृद्धी या क्षेत्राच्या महत्त्वाच्या दृष्टीने ही युद्धनौका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

तब्बल ७,४०० टन वजन, तर…

या युद्धनौकेचे तब्बल ७,४०० टन वजन आणि लांबी १६४ मीटर आहे. तर पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे, 8 बराक, 16 ब्रह्मोस अँटीशिप सेन्सर क्षेपणास्त्रे, पाळत ठेवणारे रडार, 76 एमएम रॅपिड माऊंट गन, अँटी सबमरीन आणि टॉर्पेडोने सुसज्ज आहे. या युध्दनौकेत ७५ टक्के स्वदेशी सामग्री आहे. इम्फाळ ताशी ५६ किलोमीटर वेगाने धावू शकते. विशेष बाब म्हणजे आयएनएस इंफाळ आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्धाच्या परिस्थितीत प्रभावी आहे. या युद्धनौकेवरून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत ही शत्रू देशांमध्ये दबदबा निर्माण करेल निश्चित मानले जात आहे.

७५ टक्के स्वदेशी सामग्री

इम्फाळची बांधणी आणि चाचणी करण्यासाठी लागणारा वेळ पाहता, आतापर्यंतच्या युध्दनौका पाहता, कोणत्याही भारतीय विनाशकारी युद्धनौकेच्या निर्मितीसाठी लागणारा सर्वात कमी वेळ आहे. INS इम्फाळ बांधकामात वापरण्यात आलेली साहित्य हे ७५ टक्के स्वदेशी आहे. INS इम्फाळची रचना भारतीय नौदलाची अंतर्गत संस्था वॉरशिप डिझाईन ब्युरोने केली आहे. तर विशाखापट्टणम श्रेणीतील चार विनाशकारी युद्धनौकांपैकी तिसरी आहे.

कोणत्‍याही हल्‍ल्‍याचा प्रतिकार करण्‍यास सक्षम

INN इंफाळ अण्वस्त्र हल्ला, जैविक हल्ला आणि रासायनिक हल्ल्याच्या परिस्थितीतही लढण्यास सक्षम आहे. यामध्ये संयुक्त वायू आणि गॅस प्रोपल्शन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे ही युद्धनौका 30 नॉट्सच्या वेगाने पुढे जाण्यास सक्षम आहे.

भारतीय क्षमतेचे प्रतिबिंब

नौदलाने म्‍हटलं आहे की, आयएनएस इम्फाळ ही आतापर्यंत भारतात बांधलेली सर्वोत्कृष्ट युद्धनौका आहे. ती भारताच्या क्षमतेचे प्रतिबिंब आहे. INS इंफाळ 20 ऑक्टोबर रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्‍यात आली. यापूर्वी नौदलाने यशस्वी चाचणी घेतली. आता भारताच्‍या सारगी सुरक्षेमध्‍ये महत्त्‍वाची कामगिरी बजावण्‍यासाठी ही  युद्धनौका सज्ज झाली आहे.

हिंदी महासागरात भारतीय नौदलाच्‍या सामर्थ्यात भर

हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या प्रभावाला प्रत्युत्तर म्हणून भारतीय नौदलही आपली क्षमता सतत वाढवत आहे. आयएनएस इम्फाळ नौदलात सामील झाल्याने भारतीय नौदलाच्‍या सामर्थ्यात भर पडली आहे. विशेष म्‍हणजे 19 मे 2017 रोजी ते 20 एप्रिल 2019 या कालावधीत INS इम्फाळची बांधणी झाली. सर्वात कमी वेळेत बांधणी झालेली ही युद्धनौका ठरली आहे.

हेही वाचा 

Back to top button