चिमुरडा म्‍हणतो, ७०० रुपयांना थार विकत घेणार! आनंद महिंद्रांनी दिले उत्तर... | पुढारी

चिमुरडा म्‍हणतो, ७०० रुपयांना थार विकत घेणार! आनंद महिंद्रांनी दिले उत्तर...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रख्‍यात उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्स X (पूर्वीचे ट्विटर) वर लक्षवेधी व्‍हिडिओ शेअर करत असतात. त्‍यांनी शेअर केलेल समाज प्रबोधनाचा संदेश देणारे व्‍हिडिओ नेहमी चर्चेत असतात. आता नोएडा येथील चिमुरड्याला 700 रुपयांना महिंद्रा थार विकत घ्यायची असल्‍याचा व्‍हिडिओ व्‍हायरल झाला आहे. त्‍याला आनंद महिंद्रा यांनी आपल्‍या नेहमीच्‍या खुसखुशीत शैलीत उत्तर दिले आहे. (Anand Mahindra reacts on Thar for Rs 700 )

काय म्‍हणाला चिमुरडा…

आनंद महिंद्रा यांनी व्‍हायरल होणारा व्‍हिडिओ आपल्‍या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्स X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केला आहे. या व्‍हिडिओमध्‍ये दिसणारा लहान मुलगा आपल्‍या वडिलांशी बोलताना असल्‍याचे दिसते. हा निरागस मुलगा म्‍हणतो की, महिंद्रा थार आणि एक्सयूव्ही ७०० सारख्याच आहेत. आणि त्या ७०० रुपयांना खरेदी केल्या जाऊ शकतात.

Anand Mahindra reacts on Thar for Rs 700 : “आम्ही दिवाळखोर होऊ”

७०० रुपयांना थार विकत घेणार असले म्‍हणणार्‍या चिमुरड्या चीकू यादवला आनंद महिंद्रा यांनी खुसखुशीत उत्तर दिले आहे की, मी इन्स्टा (@cheekuthenoidakid) वर त्याच्या या चिमुरड्याच्‍या काही पोस्ट पाहिल्या. आता मला त्याच्यावर खूप प्रेम आहे. माझी एकच अडचण आहे की जर आम्ही त्याचा दावा प्रमाणित केला आणि 700 रुपयांना थार विकले तर आम्ही लवकरच दिवाळखोर होऊ,” असे महिंद्रा यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये लिहिले आहे.

चिमुरड्याचा व्‍हिडिओ या वर्षी जुलैमधील आहे. चीकूच्या वडिलांनी आपल्‍या इंस्टाग्राम पेजवर तो शेअर केला होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या क्लिपला 7 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच चीकूच्‍या निरागस मागणीवरही नेटकर्‍यांनी उत्‍स्‍फूर्त प्रतिक्रिया देत त्‍यांचे कौतुकही केले आहे. त्याला थार आणि XUV 700 साठी चाइल्ड ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्याचा विचार करा,” अशी मागणीही एकाने केली आहे.

हेही वाचा :

 

 

 

Back to top button