farm laws repeal : ११५ वर्षांत शेतकर्‍यांनी चारवेळा झुकवली दिल्ली! | पुढारी

farm laws repeal : ११५ वर्षांत शेतकर्‍यांनी चारवेळा झुकवली दिल्ली!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

गेल्या 115 वर्षांत शेतकर्‍यांच्या आग्रहासमोर केंद्र सरकार ( farm laws repeal ) चारवेळा नरमलेले आहे. देशासाठी फासावर चढलेले सरदार भगतसिंग यांचे काका अजित सिंग, दीनबंधू चौधरी सर छोटूराम तसेच महेंद्रसिंह टिकैत यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनांनी सरकारवर ही वेळ आणली आहे.

गेल्या 7 वर्षांत कृषी कायद्याच्या रूपात केंद्र सरकारने ( farm laws repeal )मागे घेतलेला हा पहिलाच निर्णय आहे. शेतकर्‍यांनी याआधीही 5 वेळा दिल्लीतील सरकारला असा निर्णय घ्यायला भाग पाडले आहे. अर्थात सध्याचे हे आंदोलन गतकाळातील आंदोलनांपेक्षा दीर्घकाळ चाललेले आंदोलन आहे.

सन 1907 मध्ये शहीद-ए-आझम भगतसिंग यांचे काका सरदार अजितसिंग यांनी ‘पगडी संभाल जट्टा’ शीर्षकांतर्गत ब्रिटिश सरकारविरुद्ध आंदोलन केले होते. सर छोटूराम यांचे आंदोलनही इंग्रज आमदनीत झाले. स्वातंत्र्योत्तर काळात शेतकरी नेते महेंद्र सिंह टिकैत यांनी तत्कालीन राजीव गांधी सरकारला कृषी निगडित कायदे माघारी घेण्यास भाग पाडले होते.

सरदार अजितसिंग यांचे आंदोलन ( farm laws repeal )

1907 : ब्रिटिश सरकारने 1907 मध्ये पंजाबचे वसाहतीकरण, महसूल वाढ, पाणी दरवाढ केली होती. त्याविरुद्ध 21 एप्रिल 1907 रोजी रावळपिंडी (आता पाकिस्तानात) येथे सरदार अजितसिंग यांनी सभा घेतली. नंतर ‘पगडी संभाल जट्टा’ शीर्षकांतर्गत आंदोलनच सुरू झाले. ब्रिटिश सरकारच्या निर्णयाविरुद्ध 33 सभा ठिकठिकाणी झाल्या. त्यापैकी 19 सभांमधून अजितसिंग प्रमुख वक्ते होेते. लाला लजपतराय यांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला होता. अखेर ब्रिटिश सरकारला झुकावे लागले.

सर छोटूराम यांचे आंदोलन ( farm laws repeal )

1934 : दीनबंधू चौधरी सर छोटूराम यांनी केलेल्या आंदोलनांमुळे ब्रिटिश सरकारला कृषी क्षेत्राशी निगडित अनेक कायदे करावे लागले होते. काही कायदे रद्द करावे लागले. कर्जापोटी जप्त केलेल्या गहाण जमिनी विनामूल्य परत करण्याचा कायदा पास करावा लागला. सावकार नोंदणी कायदा केला. या कायद्यानुसार कर्ज व्यवहाराची कायदेशीर नोंद आवश्यक बनली. शेतकर्‍यांच्या मालाच्या दराच्या 40 टक्के रक्कम विविध नावांखाली आकारली जात होती, हा प्रकार सर छोटूराम यांच्या आंदोलनामुळे बंद झाला. सर छोटूराम यांना शेतकर्‍यांचे देवदूत म्हटले जात असे.

टिकैत यांचे आंदोलन ( farm laws repeal )

1988 : शेतकरी नेते महेंद्रसिंह टिकैत यांनी राजीव गांधी सरकारला आपल्या सगळ्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडले होते. टिकैत यांचे आंदोलन सुरू झाले तसे राजीव गांधी सरकार या मागण्यांकडे फारसे लक्ष देत नव्हते. 15 ऑक्टोबर 1988 रोजी टिकैत यांच्या नेतृत्वाखाली 5 लाखांवर शेतकरी दिल्लीत जमले व शेतकर्‍यांनी दिल्ली जाम केली. विजय चौक ते इंडिया गेट 7 दिवस हा ठिय्या चालला. अखेर राजीव गांधी सरकारला झुकावे लागले व टिकैत यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या.

Back to top button