Indian Ship Hijacked: भारताच्या मालवाहू जहाजाचे हुती दहशतवाद्यांकडून अपहरण; अमेरिकेचा दावा

Indian Ship Hijacked
Indian Ship Hijacked
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण समुद्रातून भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजाचे हुती दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आले आहे. दरम्यान यमेनच्या हुती दहशतवाद्यांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हे जहाज ताब्यात घेतले आहे. या मालवाहू जहाजाचे नाव गॅलेक्सी लीडर असून त्यात २५ क्रू मेंबर आहेत, असा दावा अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला आहे. या घटनेला इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने देखील ट्विट करत दुजोरा दिला आहे. (Indian Ship Hijacked)

Indian Ship Hijacked: हे 'इराणी दहशतवादी कृत्य' – इस्रायलचा आरोप

भारताचे मालवाहू जहाज दक्षिण समुद्रामार्गे तुर्कस्थानमधून भारताकडे येत होते. हुती दहशतवाद्यांनी  हे आंतरराष्ट्रीय मालवाहू जहाज ताब्यात घेतले आहे. इस्त्राईलने रविवारी केलेल्या विधानातून याला "इराणी दहशतवादाचे कृत्य" असल्याचे म्हटले आहे. तसेच जागतिक स्तरावरील ही अत्यंत गंभीर घटना असल्याचेदेखील स्पष्ट केले आहे. (Indian Ship Hijacked)

'हुती' दहशतवादी गटाकडून इस्रायलला धमकी

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, यापूर्वी हुती दहशतवादी गटाने इस्रायली जहाजांवर हल्ले करण्याचा इशारा दिला होता. हुतींच्या प्रवक्त्याने सांगितले होते की, इस्रायलच्या वतीने जाणाऱ्या सर्व जहाजांना लक्ष्य केले जाईल, अशी धमकी हुती दहशतवाद्यांनी इस्रायल सरकारला दिला होता; परंतु यापूर्वी हुतींनी ताब्यात घेतलेले हे जहाज आपले नाही आणि जहाजावर एकही इस्रायली किंवा भारतीय नागरिक नसल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भातील माहिती इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिली होती. कतार मीडिया हाऊस 'अलजजीरा'ने दिलेल्या माहितीनुसार, हे मालवाहू जहाज ब्रिटनचे असून ते जपानी कंपनी चालवत आहे. (Indian Ship Hijacked)

जागतिक समुद्रमार्ग सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

 अशा प्रकारचे दहशतवादी कृत्य जागतिक मुक्त नागरिकांविरूद्ध इराणकडून युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचे संकेत दर्शवते. त्यामुळे जागतिक समुद्रमार्गाच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे देखीस इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news