Brij Bhushan : आता मी स्वतःला फाशी द्यावी का?, कुस्‍तीपटूंच्‍या आंदोलनास काँग्रेसचे समर्थन : बृजभूषण | पुढारी

Brij Bhushan : आता मी स्वतःला फाशी द्यावी का?, कुस्‍तीपटूंच्‍या आंदोलनास काँग्रेसचे समर्थन : बृजभूषण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (Wrestling Federation of India) म्हणून संजय सिंह (Sanjay Singh) यांची निवड झाली आहे. मात्र त्‍यांच्‍या निवडीचा आंदोलक कुस्‍तीपटूंनी तीव्र निषेध सुरुच आहे. कुस्‍तीपटूंच्‍या विरोधाला भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष व भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh Sharan) यांनी पुन्‍हा एकदा उत्तर दिले आहे. तसेच कुस्‍तीपटूंचे आंदोलन केवळ काँग्रेस पक्षाचाच पाठिंबा आहे, या पक्षाशिवाय अन्‍य कोणीही त्‍यांचे समर्थन करणार नाही, असा पुन्‍नरुचारही त्‍यांनी केला आहे.

Brij Bhushan : आंदोलक कुस्‍तीपटूंना केवळ काँग्रेस पक्षाचे समर्थन

भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख म्हणून संजय सिंग यांची निवडविरोधात सुरु असलेल्‍या निषेधाला उत्तर देताना ब्रिजभूषण सिंग शरण म्हणाले की, विरोध करणार्‍या कुस्तीपटूंना केवळ काँग्रेस पक्षाचे समर्थन आहे. त्‍यांना देशातून अन्‍य कोणाचेही समर्थन नाही. इतर कुस्तीपटू विरोध करणाऱ्यांना पाठिंबा देत नाहीत कारण हे आंदोलन केवळ काँग्रेसच्‍या समर्थनावरच सुरु आहे. आता त्यांच्याशी लढण्यासाठी मी स्वतःला फाशी द्यावी का?, असा सवालही त्‍यांनी केला.

Brij Bhushan : कुस्‍ती खेळाच्‍या प्रगतीवर परिणाम

मागील ११ महिन्‍यांहून अधिक काळ कुस्‍तीपटूंच्‍या आंदोलनामुळे कुस्‍ती या क्रीडा प्रकाराच्‍या प्रगतीवर परिणाम झाला आहे. नुकत्‍याच भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपदाची निवडणूक ही कोणाचाही हस्‍तक्षेप आणि निष्‍पक्षरित्‍या पार पडल्‍या आहेत, असा दावा करत संजयसिंह हे बहमुताने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपदी निवडून आले आहेत. इतर उमेदवार 33 मतांनी पराभूत झाला आहे. आमचा उद्‍देश केवळ कुस्‍ती खेळाच्‍या सुधारणेसाठी काम करण्‍याचा आहे, असा दावाही बृजभूषण यांनी केला.

साक्षी मलिकने निवृत्ती स्‍वीकारली असेल तर मी काय करु?

देशातील अव्वल कुस्तीपटूंचा संजय सिंह यांच्‍या निवडीला अजूनही विरोध सुरु आहे. साक्षी मलिकने कुस्‍तीतून निवृत्तीच घेतली आहे. तिने घेतलेल्‍या निर्णयानंतर मी काय मदत करू शकतो? आंदोलक कुस्‍तीपटू मागील अनेक महिन्‍यांपासून आमच्‍यावर आमच्यावर अत्याचार करत आहेत. त्यांना तसे करण्याचा अधिकार कोणी दिला आहे?, असे सवालही त्‍यांनी केले.

आंदोलक कुस्‍तीपटूंची मागणी काय?

बृजभूषण सिंह यांनी सात कुस्तीपटूंविरुद्ध लैंगिक छळ केल्‍याचा आरोप विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अव्वल ऑलिम्पिक पदक विजेत्‍या सात कुस्तीपटूंनी केला. बृजभूषण सिंह यांना तत्‍काळ अटक करावी, अशी मागणी करत दिल्‍लीतील जंतर-मंतरवर प्रदीर्घ काळ आंदोलनही केले होते. या प्रकरणी पोलिसांनी बृजभूषण सिंह यांच्‍याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी गुरुवारी (21 डिसेंबर) निवडणूक पार पडली. संजय सिंह यांनी या निवडणुकीत माजी कुस्तीपटू अनिता शेरॉन यांचा पराभव केला. एकूण 47 जणांनी या निवडणुकीत मतदान केले. यापैकी 40 मते संजय सिंह यांच्या पारड्यात पडली, तर अनिता यांना केवळ सात मते मिळाली.

मी ‘पद्मश्री’ परत करतोय… PM मोदींना पत्र लिहून बजरंगची पुरस्कार वापसी

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून संजय सिंह यांची निवड झाल्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणार्‍या बजरंग पुनियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पद्मश्री पुरस्कार परत करीत असल्याची घोषणा केली आहे.

बृजभूषण सिंह यांच्‍याविरोधात जानेवारीमध्ये तक्रारदार महिला कुस्तीपटूंची संख्या 19 होती, ती एप्रिलपर्यंत 7 वर आली. म्हणजेच या 3 महिन्यांत आपल्या ताकदीच्या जोरावर बृजभूषण यांनी 12 महिला कुस्तीपटूंना आपल्या न्यायाच्या लढाईत पराभूत केले होते. हे आंदोलन 40 दिवस चालले. या 40 दिवसांत आणखी एक महिला कुस्तीगीर मागे हटली. आम्हा सर्वांवर खूप दबाव होता. आमच्या निषेध स्थळाची तोडफोड करण्यात आली आणि आमचा दिल्लीतून पाठलाग करण्यात आला आणि आमच्या निषेधावर बंदी घालण्यात आली, असेही बजरंग पुनिया याने म्हटले आहे.

Back to top button