Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिद प्रकरणी ‘पुरातत्त्व’चा अहवाल सादर; 21 डिसेंबरला पुढील सुनावणी

Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिद प्रकरणी ‘पुरातत्त्व’चा अहवाल सादर; 21 डिसेंबरला पुढील सुनावणी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय पुरातत्त्व विभागाने ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे पूर्ण केला असून हा अहवाल सोमवारी वाराणसी जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आला. यावर आता २१ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. पुरातत्त्व विभागाने सादर केलेला अहवाल हा सीलबंद लखोट्यात आहे, हा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी हिंदू पक्षाने केला आहे. (Gyanvapi Mosque)

हिंदू पक्षाचे बाजू मांडणारे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, "हा अहवाल जनतेसाठी खुला करण्यात यावा. सीलबंद अहवाल सादर करून पुरातत्त्व विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली केली आहे. या संदर्भात आम्ही न्यायालयात दाद मागितली असून यावर २१ डिसेंबरला सुनावणी होणार आहे." तर अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीने हा अहवाल जाहीर न करण्याच मागणी केली आहे.

वाराणसी जिल्हा न्यायालयाने पुरातत्त्व विभागाला ज्ञानवापी मशिद परिसराचा पाहाणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. ज्ञानवापी मशिद ही काशी विश्वनाथ मंदिराच्या बाजूला आहे. १७व्या शतकातील ही मशिद पूर्वीच्या हिंदू मंदिरावर उभारली आहे का याची पाहाणी करण्यासाठी पुरात्तत्व विभागाला हा अहवाल देण्यासाठी सांगण्यात आले होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news