‘ज्ञानवापी’च्या सर्वेक्षण अहवालासाठी ‘एएसआय’ने मागितला आठ आठवड्यांचा कालावधी | पुढारी

'ज्ञानवापी'च्या सर्वेक्षण अहवालासाठी 'एएसआय'ने मागितला आठ आठवड्यांचा कालावधी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षण अहवाल सादर करण्‍यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) ८ आठवड्यांचा वेळ मागितला आहे. या प्रकरणी आता शुक्रवार ८ सप्‍टेंबर रोजी वाराणसी न्‍यायालयात सुनावणी होणार असल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. दरम्‍यान सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा अर्ज न्यायालय स्वीकारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘एएसआय’च्या भारत सरकारचे स्थायी वकील अमित श्रीवास्तव, वडिनीचे अधिवक्ता सुभाष नंदन चतुर्वेदी आणि अधिवक्ता सोहनलाल आर्य यांच्यासह ‘एडीजे’ संजीव सिन्हा यांच्‍या न्यायालयात अर्ज दाखल केला. वकिलाच्या मृत्यूमुळे न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ४ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.

सीलबंद गोदाम वगळता ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण करून 2 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश न्यायालयाने दिले होते. ‘एसएसआय’ टीम चार ऑगस्टपासून सर्वेक्षण करत आहे. यामध्ये जीपीआर तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू आहे, त्यामुळे आज न्यायालयात अहवाल दाखल होण्याची फारशी आशा नव्हती. आता अर्जाच्या आधारे न्यायालय आदेश देणार आहे. केंद्र सरकारचे स्थायी वकील अमित श्रीवास्तव यांनी सांगितले की, सध्या ज्ञानवापीचे सर्वेक्षण सुरू आहे.

हेही वाचा : 

Back to top button