

लुधियाना (पंजाब) : वृत्तसंस्था
वस्त्रोद्योग क्षेत्रातील वर्धमान समूहाचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक एस. पी. ओसवाल (वय 82) यांच्याकडून सायबर गुन्हेगारांनी 7 कोटी रुपये लाटल्याची घटना समोर आली आहे. ओसवाल यांना ‘पद्मभूषण’ हा नागरी सन्मानही प्राप्त झालेला आहे.
साधारणपणे दीड महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा बनावट वॉरंट दाखवून तसेच आम्ही सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून 5 राज्यांतील 9 सायबर गुंडांनी ओसवाल यांना धमकी दिली. समूहाची मालमत्ता जप्त होणार आहे, असा दम दिला आणि पैसे लाटले. ओसवाल यांनी अखेर 31 ऑगस्टला पोलिसांत तक्रार केली.
1) पंजाब पोलिसांचे पथक आसाममधील गुवाहाटी येथे दाखल झाले. तीन दिवस शोध घेतला. अतनू चौधरी आणि आनंद चौधरी या आरोपींना अटक केली.
2) पोलिसांनी दोघांकडून 5.25 कोटी रुपये जप्त केले आहेत. सायबर फसवणुकीतील आतापर्यंतची ही सर्वात मोठी रोख जप्त असल्याचे मानले जात आहे. 9 जणांची ही टोळी आहे.
रुमी ही युवती या टोळीची बॉस आहे आरोपी कायदा, यंत्रणांचे जाणकार आहेत. सर्व आरोपी अस्खलित इंग्रजी बोलतात.सर्व गुन्हेगार उच्चशिक्षित आहेत.