Raosaheb Danve | इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी ममता बॅनर्जी पीएम मोदींना भेटणार; केंद्रीय मंत्री दानवेंची माहिती | पुढारी

Raosaheb Danve | इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी ममता बॅनर्जी पीएम मोदींना भेटणार; केंद्रीय मंत्री दानवेंची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडिया आघाडीतील कोणी विपश्यनेला जाणार आहे. कोणी ऑनलाईन बैठकीला हजेरी लावणार आहेत. तर कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मग बैठकीला हजेरी लावायची की नाही ते ठरवणार आहे, याचाच अर्थ या बैठकीत काही राम उरला नाही, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज (दि.१८) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. (Raosaheb Danve)

पाटणा, बंगळूर, मुंबईनंतर आता उद्या (दि.१९) दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. इंडिया आघाडीची उद्या दिल्लीत होणारी चौथी बैठक आहे. या बैठकीला २८ पक्षांचे प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, काहीही करून २०२४ मध्ये भाजपचा कसा पराभव होईल, हा एकमेव इंडिया पक्षाचा अजेंडा आहे. दरम्यान, पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत एका राज्यात अनपेक्षितपणे काँग्रेसला यश मिळाले. दोन राज्य हातून गेले. तसेच भाजपला तीन राज्यात बहुमतांसह विजय मिळाला. अशा नैराश्येत असलेले पक्ष कितीही एकत्र आले तरी भाजपच्या यशावर कोणताही परिणाम होणार नाही, असे देखील रावसाहेब दानवे यांनी आज माध्यमांसमोर बोलताना स्पष्ट केले. (Raosaheb Danve)

इंडिया आघाडातील कितीही पक्षाचे नेते एकत्र आले तरी यांचा अजेंडा ठरवला जाणार नाही. यांचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार ठरवला जाणार नाही. जरी कोणी उपस्थित राहिले तरी ही आघाडीची ही बैठक वांजोटी असल्याचे देखील दानवे म्हणाले. (Raosaheb Danve)

हेही वाचा:

Back to top button