मराठा आरक्षण प्रकरणी संभाजीराजेंनी बोलावली महाराष्ट्रातील खासदारांची बैठक

मराठा आरक्षण प्रकरणी संभाजीराजेंनी बोलावली महाराष्ट्रातील खासदारांची बैठक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाविषयी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी संसदेत एकमताने आवाज उठवावा, यावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्लीत महाराष्ट्रातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक बोलावली आहे. १८ डिसेंबरला (सोमवार) ही बैठक बोलावण्यात आली आहे.

दरम्यान उद्या होत असलेल्या बैठकीला राज्यातील कोणकोणते खासदार उपस्थित राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संसदेतही मराठा आरक्षण प्रश्नावर राज्यातील काही खासदारांनी प्रश्न मांडला आहे. राज्य विधिमंडळात मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत, असे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी बोलावलेली बैठक दिल्लीत होत आहे. त्यामुळे भाजपचे किती खासदार या बैठकीला उपस्थित राहतात किंवा त्यांची भूमिका काय असेल, हेही पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news