पुढारी ऑनलाईन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन (US President Joe Biden) यांच्या सुरक्षेत मोठी चूक दिसून आली आहे. त्यांच्या सुरक्षेच्या ताफ्यातील एक मोटारकेड एसयूव्हीला कारने धडक दिली. सुदैवाने या अपघातातून बायडेन थोडक्यात बचावले आहेत. रविवारी रात्री ही घटना घडली. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन डाउनटाउन विल्मिंग्टन येथील प्रचार मुख्यालयातून जेव्हा बाहेर पडले त्याचदरम्यान हा अपघात घडला. पण जिल बायडेन सुरक्षित असल्याच्या सांगण्यात आले आहे.
व्हाईट हाऊसने जारी केलेल्या प्रसिद्धी अहवालानुसार, बायडेन दाम्पत्य रात्रीचे जेवण उरकल्यानंतर त्यांच्या पुनर्निवडणूक प्रचार पथकासोबत डाउनटाउन विल्मिंग्टन येथील बायडेन-हॅरिस २०२४ मुख्यालयातून रात्री ८:०७ वाजता बाहेर पडले होते.
बायडेन यांनी एका पत्रकाराशी संवाद साधल्यानंतर काही क्षणात डेलावेअर परवाना प्लेट्स असलेली सिल्व्हर सेडान कार मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात मोटारकेडचे रक्षण करणार्या एसयूव्हीला धडकली.
या अपघातात सिल्व्हर सेडान कारचा बंपर खराब झाला आहे. ती थांबल्यानंतर लगेचच सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारला घेरले आणि कारचालकाच्या दिशेने शस्त्रे रोखली. त्यानंतर त्याने हात वर केले. या घटनेनंतर बायडेन दाम्पत्य विल्मिंग्टन येथील त्यांच्या घरी सुखरूप परतले, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
कारचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेची अधिक चौकशी केली जात आहे. (US President Joe Biden)
हे ही वाचा :