PM Modi : आता ब्रह्मांडातील कोणतीही शक्ती कलम ३७० पुन्हा आणू शकत नाही : पंतप्रधान मोदी | पुढारी

PM Modi : आता ब्रह्मांडातील कोणतीही शक्ती कलम ३७० पुन्हा आणू शकत नाही : पंतप्रधान मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू काश्मीरचे ३७० कलम (Article 370 verdict) रद्दबातल करून नव्या व्यवस्थेने जम्मू काश्मीरला उर्वरित भारताशी जोडण्याची प्रक्रिया बळकट केली आहे, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाने दिला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनीही कलम ३७० वरून विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी “आता ब्रह्मांडातील (Brahmand) कोणतीही शक्ती कलम ३७० पुन्हा आणू शकत नाही,” असे म्हटले आहे.

संबंधित बातम्या : 

पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने एका देशात दोन कायदे राहणार नाहीत, हे या निकालातून सांगितले आहे. कलम ३७० रद्द करणे हे कोणत्याही राजकारणापेक्षा जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या लोकांसाठी महत्त्वाचे आहे. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी आणि तेथील लोकांचे जीवन सुसह्य होण्यासाठी ते आवश्यक होते, असे म्हटले आहे.

यावेळी पंतप्रधान मोदींनी (PM Modi) पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सवर निशाणा साधला. जम्मू-काश्मीरमधील सामान्य जनता कोणत्याही स्वार्थी राजकारणाचा भाग नाही आणि होऊही शकत नाही. काही कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. येथील नागरिकांना भूतकाळातील संकटांवर मात करून देशाच्या सामान्य नागरिकाप्रमाणे कोणताही भेदभाव न करता आपल्या मुलांचे भविष्य आणि वर्तमान सुरक्षित करायचे आहे.

जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये चित्र बदलले

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाखचे चित्र बदलले असल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला. आता तिथे सिनेमा हॉल सुरू आहेत. तिथे दहशतवादी नाहीत, आता पर्यटकांची यात्रा आहे. आता तिथे दगडफेक होत नसून चित्रपटांचे चित्रीकरण होत असल्याचे ते म्हणाले. आजही जे राजकीय स्वार्थापोटी कलम ३७० बद्दल संभ्रम पसरवत आहेत, त्यांना मी स्पष्टपणे सांगेन, आता ब्रह्मांडातील (Brahmand) कोणतीही ताकद कलम ३७० परत आणू शकत नाही, असेही मोदी म्हणाले.

हेही वाचा : 

 

Back to top button