Farm Laws : चौथ्या पिढीच्या युद्धात भारताचा पराभव होतोय....सोशल मीडियावर मीम्सचा पूर | पुढारी

Farm Laws : चौथ्या पिढीच्या युद्धात भारताचा पराभव होतोय....सोशल मीडियावर मीम्सचा पूर

पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी तिन्ही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. राष्ट्राला संबोधित करताना, कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा होताच, सोशल मीडियावरही अनेक प्रकारच्या पोस्ट आणि मीम्सचा पूर आला आहे. हे कृषी कायदा विधेयक मागे घेतल्यावर राजकारण्यांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, काहींनी हा निर्णय शेतकर्‍यांचा विजय असल्याचे म्हटले तर काहींनी या घोषणेने दु:खही व्यक्त केले.

एका सोशल मीडिया यूजरने या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे की, शेतकऱ्यांच्या आंदोलनासमोर पीएम मोदी सरकारची मोहीम खंडित झाली आहे, तर एका यूजरने म्हटले आहे की, या निर्णयामुळे 100 कोटी भारतीयांचे हृदय तुटले आहे.

Farm law withdrawn by Govt t

सौरव चंदा यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, ‘हा शेतकऱ्यांचा विजय आहे, तर भारताचा पराभव आहे. शेतकऱ्यांना हे कायदे समजू शकले नाहीत. ते त्यांच्या हिताचे होते. वाईट दिवस आले आहेत. चौथ्या पिढीच्या युद्धात भारताचा कसा पराभव होतोय याचे हे उदाहरण आहे.

Farm law withdrawn-

सिद्धार्थ गुप्ता यांनी लिहिलं आहे की, ‘म्हणूनच आंदोलन आणि निषेध महत्त्वाचा आहे. लोकशाहीप्रमाणे हुकूमशाही राजवटीत, काही वेळा मतपत्रिकेशिवाय इतर मार्गांनी आवाज उठवावा लागतो. याबद्दल मी सरकारचे आभार मानणार नाही, परंतु कायदे रद्द केल्याने मला आनंद झाला आहे.

Farm law withdrawn

आमदार नरेश बाल्यान यांनी लिहले आहे की,आता सरकारच्या समर्थकांना हा निर्णय डिफेन्ड करावा लागणार आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले आहे की ज्यांनी कृषी कायद्यांचे मास्टरस्ट्रोक म्हणून वर्णन करणारे मोठे लेख लिहिले होते, ते आता पुन्हा लेख लिहून कृषी कायद्यांच्या पुनरागमनाला मास्टरस्ट्रोक म्हणतील.

Farm law withdrawn by Govt

राजीव राजपूत यांनी लिहिलं आहे की, नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्यांनी ठरवावं काय महत्त्वाचं? हिंदुस्थान किंवा खलिस्तानला हवा द्यायची… ऐतिहासिक निर्णय, राष्ट्रहिताचा निर्णय.

हेही वाचा : 

शरद पवार म्हणाले, आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे

एसटी खासगीकरणाच्या मार्गावर, लांब पल्ल्यांच्या मार्गांवर खासगी गाड्या सोडणार

 

Back to top button