छत्तीसगड मुख्‍यमंत्रीपदी साय, उपमुख्‍यमंत्रीपदी साव आणि शर्मा; सरकारचे चित्र झाले स्पष्ट | पुढारी

छत्तीसगड मुख्‍यमंत्रीपदी साय, उपमुख्‍यमंत्रीपदी साव आणि शर्मा; सरकारचे चित्र झाले स्पष्ट

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : छत्तीसगड भाजप सरकारमधील नवीन सत्ताधीश कोण? या प्रश्‍नाचे उत्तर अखेर विधानसभा निवडणुकीच्‍या निकालानंतर आठव्‍या दिवशी मिळाले. आज (दि.१०) राज्य भाजप कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठकीत छत्तीसगडचे नवे मुख्‍यंमत्री म्‍हणून विष्‍णुदेव साय यांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब झालं. यानंतर राज्यात दोन उपमुख्यमंत्री होणार हेही निश्चित झाले. (Chhattisgarh deputy cm ) छत्तीसगडचे उपमुख्यमंत्रीपद अरुण साव आणि विजय शर्मा यांच्याकडे सोपविण्‍यात आले आहे. तर भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते आणि राज्‍यात सलग १५ वर्ष मुख्‍यमंत्रीपद संभाळलेले रमण सिंह यांच्‍याकडे विधानसभा अध्‍यक्षपद सोपविण्‍याचा निर्णय झाला आहे.

आज दुपारी मुख्यमंत्रीपदी नियुक्‍तीची घोषणा झाल्यानंतर विष्णुदेव साय यांनी राजभवनात राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची भेट घेतली. यावेळी त्‍यांनी सरकार स्थापनेचा दावाही केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ९० जागांपैकी 54 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला 35 जागांवर समाधान मानावे लागले. यंदाच्‍या निवडणुकीत भाजपने अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी राखीव असलेल्या २९ जागांपैकी १७ जागा जिंकल्या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button