'इंडिया' आघाडीची आता १९ डिसेंबर रोजी बैठक : काँग्रेस नेते जयराम रमेश यांची माहिती | पुढारी

'इंडिया' आघाडीची आता १९ डिसेंबर रोजी बैठक : काँग्रेस नेते जयराम रमेश यांची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडिया आघाडीची चाैथी  बैठक १९ डिसेंबर रोजी दिल्‍लीत होईल, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली आहे.

इंडिया आघाडीची चौथी बैठक पुढे ढकलण्‍यात आली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर ही बैठक 17 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. इंडिया आघाडीची चाैथी  बैठक १९ डिसेंबर रोजी दिल्‍लीत  दुपारी तीन वाजता होईल, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली आहे.

मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थानचे निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या दिवशी काँग्रेसने ६ डिसेंबरला बैठक बोलावली होती. कार्य व्‍यस्‍ततेमुळे या बैठकीला उपस्‍थित राहता येणार नाही, असे बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार, प. बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्‍पष्‍ट केले होते. यानंतर इंडिया आघाडीची बैठक लांबणीवर पडली होती.

हेही वाचा : 

 

 

Back to top button