KCR injured : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव रूग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? | पुढारी

KCR injured : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव रूग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखरराव (केसीआर) जखमी झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल (दि.८) रात्री ते त्यांच्या एरवल्ली येथील फार्महाऊसमध्ये पडल्याने त्यांना तात्काळ यशोदा रुग्णालयात दाखल केले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. (KCR injured

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव हे त्यांच्या फार्महाऊसवर पडल्याने ते जखमी झाले आहेत. ते धोतर बांधत असताना ही घटना घडली आहे. यामध्ये त्यांचे हिप बोन फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्यावर हिप शस्त्रक्रिया करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान केटी रामाराव, हरीश राव आणि कविता हे रूग्णालयात पोहचले असून, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत, असे टाईम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (KCR injured)

मुलगी के. कविता यांनी ट्विट करत दिली तब्येतीची माहिती

तेलंगणा BRS एमएलसी आणि के चंद्रशेखरराव यांची मुलगी के कविता यांनी ट्विट करत केसीआर यांच्या तब्येती संदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,  बीआरएस प्रमुख केसीआर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. ते सध्या रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांच्यामागे जनतेचा पाठिंबा आणि शुभेच्छा असल्याने बाबा लवकरच बरे होतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत बीआरएसच्या नुकत्याच झालेल्या पराभवानंतर ही  घडला आहे. दरम्यान विधानसभेत रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ६४ जागांसह लक्षणीय विजय मिळवला. तर के चंद्रशेखरराव (केसीआर) यांच्या नेतृत्त्वाखालील बीआरएसला केवळ ३९ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान के. चंद्रशेखरराव यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली. गजवेल विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले तर कामरेड्डीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. (KCR injured)

हेही वाचा:

Back to top button