INDIA आघाडीबाबत अखिलेश यादव यांचे मोठे विधान, "पराभवानंतर आघाडी..." | पुढारी

INDIA आघाडीबाबत अखिलेश यादव यांचे मोठे विधान, "पराभवानंतर आघाडी..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेश, राजस्‍थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. या यशामुळे भाजप विरोधी इंडिया आघाडीतील मतभेदाची चर्चा सुरु असतानाच समाजवादी पार्टीचे प्रुमख अखिलेश यादव यांनी INDIA आघाडीबाबत मोठे विधान केले आहे. ( INDIA alliance )

माध्‍यमांशी बोलताना अखिलेश यादव म्‍हणाले की, पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या पाच राज्‍यांपैकी तीन राज्‍यांमध्‍ये भाजपने विजय मिळवला आहे. या निकालामुळे आगामी काळात INDIA आघाडी अधिक मजबूत होईल. हे निकाल भाजपविरोधी राजकीय पक्षांच्‍या आघाडी एकसंघ होईल. देशातील लोकांना भाजपला सत्तेतून भाजपला हद्दपार करायचे आहे. निकालांवरून दिसून येते की लोकांना बदल हवा होता. त्यामुळे भाजपला आगामी निवडणुकांबाबत काळजी करणे आवश्यक आहे.येणाऱ्या काळातही जनता परिवर्तनालाच मत देईल, असा विश्‍वासही अखिलेश यांनी यावेळी व्‍यक्‍त केला. ( INDIA alliance )

इंडिया आघाडीची उद्या (दि.६) दिल्‍लीत होणारी बैठक अनेक प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह आघाडीतील काही प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याच्या वृत्तानंतर बैठक रद्द करण्यात आली. पुढील बैठक १८ डिसेंबरला होणार असल्याची माहिती मिळत आहे. (I.N.D.I.A bloc meeting)

५ राज्‍यांमधील निवडणूक निकालावर होणार होती चर्चा

चार राज्‍यांमधील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होताच भाजप विरोधी इंडिया आघाडीने ६ डिसेंबर रोजी बैठक बोलवली होती. (INDIA bloc meet) काँग्रेस पक्षाचे अध्‍यक्ष मल्‍लिकार्जून खर्गे यांनी इंडिया आघाडीतील २८ पक्षांच्‍या नेत्‍यांना दिल्‍लीत बैठकीसाठी निमंत्रण दिले आहे. या बैठकीत पाच राज्‍यांमधील निवडणूक निकालावर चर्चा केली जाणार होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम, तेलंगणा राज्‍यातील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत. यानंतर ६ डिसेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक होणार होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह प्रमुख नेत्यांनी बुधवारी होणारी इंडिया आघाडीची बैठक पुढे ढकलली आहे. (I.N.D.I.A bloc meeting)

INDIA bloc meet : दुसर्‍या बैठकीत इंडिया नावावर झाले होते शिक्‍कामोर्तब

इंडिया आघाडीची पहिली बैठक ही २३ जून २०२३ रोजी पाटणा येथे झाली होती. यावेळी निमंत्रक बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार होते. यावेळी १५ पक्षांचे प्रमुख बैठकीला उपस्‍थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांच्‍या ऐक्‍यावर यावेळी चर्चा झाली आहे. यानंतर १७ आणि १८ जुलै रोजी बंगळूरु येथे विरोधी पक्षांच्‍या ऐक्‍याची दुसरी बैठक झाली. यावेळी २६ पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत विरोधी पक्षांच्‍या आघाडीचे नाव इंडिया ( इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स INDIA ) असे ठेवण्‍यात आले होते

इंडिया आघाडीची शेवटची आणि तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत झाली. यावेळी इंडिया आघाडीने प्रचार समिती, समन्वय/रणनीती समिती, मीडिया, सोशल मीडिया आणि संशोधन अशा पाच समितींची स्‍थापना केली होती. या बैठकीत 28 विरोधी पक्षांनी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीची रणनीतीवरही चर्चा केली होती.

हेही वाचा : 

 

 

Back to top button