पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवत काँग्रेसचा पराभव केला. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी आरोप केला की चिप असलेले कोणतेही मशीन हॅक केली जाऊ शकते. मी २००३ पासून ईव्हीएमद्वारे मतदानाला विरोध करत आहे. आता त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह X वर पोस्ट करत ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. (MP Election Results)
"चीप असलेले कोणतेही मशीन हॅक केली जाऊ शकते. मी २००३ पासून ईव्हीएमद्वारे मतदानाला विरोध करत आहे. आपण आपल्या भारतीय लोकशाहीला प्रोफेशनल हॅकर्सद्वारे नियंत्रित करू देऊ शकतो का! हा मूलभूत प्रश्न आहे ज्याकडे सर्व राजकीय पक्षांनी लक्ष देणे आवश्यक आहे. निवडणूक आयोग (ECI) आणि सर्वोच्च न्यायालय तुम्ही कृपया आमच्या भारतीय लोकशाहीचे रक्षण कराल का?" असे सिंह यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
संबंधित बातम्या
सिंह यांनी 'X' वर एका थ्रेडचा उल्लेख केला आहे ज्यामध्ये रवी नायर या पत्रकाराने ईव्हीएम कसे अचूक नाहीत आणि लोकशाहीसाठी कसे सुरक्षित नाहीत हे स्पष्ट केले आहे.
"जोपर्यंत प्रत्येक स्लिपची मोजणी होत नाही तोपर्यंत VVPAT हे सुरक्षित साधन नाही. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात छेडछाड करणे शक्य नाही. ३ ते ३.५ टक्के छेडछाड केलेल्या ईव्हीएममुळे निकालात मोठा बदल होईल आणि यामुळे कोणताही राजकीय पक्ष निवडणूक जिंकेल. ईव्हीएमद्वारे मतदान हे लोकशाहीसाठी सुरक्षित नाही," असे नायर यांनी 'X' वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (MP Election Results)
नायर यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरील भाजप नेते जीव्हीएल नरसिंह राव यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठही पोस्ट केले आहे.
भाजपने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्त्वाखाली मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे.