Nashik Accident : टेम्पोच्या धडकेने रिक्षातील आजोबासह नातीचा मृत्यू | पुढारी

Nashik Accident : टेम्पोच्या धडकेने रिक्षातील आजोबासह नातीचा मृत्यू

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी-वणी रस्त्यावर अवनखेड शिवारात रिक्षा व टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात रिक्षातील आजोबासह आठवर्षीय नातीचा जागीच मृत्यू झाला. तर दुर्दैवी चिमुरडीचे रिक्षाचालक वडील जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वणीकडून दिंडोरीकडे येणारी आयशर (क्रमांक एमएच 13, डीक्यू 6499) ने अवनखेड शिवारात चुकीच्या दिशेने येत दिंडोरीहून वणीकडे जाणारी रिक्षा (क्रमांक एमएच 15 एफयू 0439) ला धडक दिली. यामुळे रिक्षात मागे बसलेले आजोबा बापूगौडा ईश्वरगौडा पाटील (65, रा. भोसरी, पुणे) व नात अवनी कैलास चौघुले (८, रा. पेठरोड, नाशिक) यांचा मृत्यू झाला. रिक्षाचालक वडील कैलास सखाराम चौघुले (41, रा. पेठरोड, नाशिक) हे जखमी झाले. त्यांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी आयशरचालक दत्तात्रय मुरगुडे (रा. उपलाई, ता. बार्शी, जि. सोलापूर) विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक देशमुख, पोलिस नाईक श्रीकांत गारुंगे अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button