

विशिष्ट लोकांसाठी 'गाय' ही पशूधन खूप महत्वाचं आहे. गायीचं शेण (Cow Dung) आणि गोमूत्र व्यक्तीच्या आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे, असे कित्येकजण सांगत असतात. अशा व्यक्तींमध्ये डाॅक्टर, शास्त्रज्ञ आणि अन्य क्षेत्रातील महत्वाची माणसंदेखील आघाडीवर असतात. असंच गायीच्या शेणाचं महत्व सांगणारे MBBS, MD झालेल्या एका डाॅक्टरांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या डाॅक्टरांचं नाव मनोज मित्तल असून ते कर्नलचे रहिवासी आहेत. MBBS, MD असणारे मनोज मित्तर या व्हिडिओमध्ये गायीचं शेण खाताना आणि गोमूत्र पिताना दिसत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार गायीच्या शेणामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन बी असते. त्यामुळे रेडिएशनपासून त्यांचा बचाव होतो, असा दावा या डाॅ. मित्तल महाशयांनी केलेला आहे.
ते पुढे म्हणतात की, "मोबाईल, एसी, फ्रीज आणि अन्य इलेक्ट्रिक उपकरणांमधून रेडिएशन निघतं, त्यामुळे माणसांच्या शरीरावर परिणाम होतो. त्यातून कर्करोगासारखे आजारदेखील होतात. पण, गायीचं शेण (Cow Dung) खाल्लं की, रेडिएशनचा परिणाम कमी करता येऊ शकतो, असंही मित्तल यांनी सांगितलं.
इतकंच नाही मित्तल पुढे सांगतात की, "गर्भवती महिलेनं प्रसुती दरम्यान गायीचं शेण खाल्लं की, प्रसुतीवेळी संबंधित महिलेला फारसा त्रास होत नाही. शेण खाल्ल्यामुळे अनेक आजार बरे होतात. गायीच्या शेणामध्ये २८ टक्के ऑक्सिजन असतो." मनोज मित्तल हे बालरोग तज्ज्ञ आहेत आणि ते कर्नालमध्ये आपलं मोठं रुग्णालय चालवतात. ते म्हणतात की, आपण जमिनीवर झोपतो आणि एसीचा वापर करत नाही."
डाॅ. मित्तलांचा प्रत्यक्ष शेण खातानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर समिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. काही जण त्यांच्या डाॅक्टर पदवीवर शंंका उपस्थित करत आहेत. तर काही जण मित्तलांच्या बाजुने उभे राहून त्यांचे समर्थन करत आहेत.