मनी लाँड्रिंग प्रकरणी 'आप' नेते संजय सिंह यांच्‍याविरुद्ध 'ईडी'चे आरोपपत्र दाखल | पुढारी

मनी लाँड्रिंग प्रकरणी 'आप' नेते संजय सिंह यांच्‍याविरुद्ध 'ईडी'चे आरोपपत्र दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍लीतील मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंहांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज (दि.२) राऊस एव्हेन्यू न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. याप्रकरणी संजय सिंह यांना ऑक्‍टोबर महिन्‍यात अटक करण्‍यात आली होती. तेव्‍हापासून ते तिहार कारागृहात आहेत. ( Delhi excise policy case )

संजय सिंह यांना न्यायालयाने यांना १० नोव्हेंबर रोजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तसेच यानंतर २४ २४ नोव्‍हेंबर रोजी न्यायालयाने 4 डिसेंबरपर्यंत कोठडी वाढवली होती. संजय सिंह यांनी राऊस अॅव्हेन्यू कोर्ट, दिल्ली उच्‍च न्‍यायालय आणि सर्वोच्‍च न्‍यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केल्या होत्या. मात्र त्‍यांचा जामीन नामंजूर झाला होता. (Delhi excise policy case )

ईडीचे मनी लाँड्रिंग प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) एफआयआरशी संबंधित आहे. सीबीआय आणि ‘ईडी’च्या म्हणण्यानुसार, आता रद्द केलेल्या दिल्ली उत्पादन शुल्क धोरण 2021-22 मध्ये सुधारणा करताना अनियमितता करण्यात आली होती आणि परवानाधारकांना बेकायदा लाभ देण्यात आला होता. हे धोरण तयार करणे आणि अंमलबजावणीमध्ये संजय सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यामुळे काही दारू उत्पादक, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांना आर्थिक फायदा झाला असा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button