पुढारी ऑनलाईन : जम्मू काश्मीरच्या अरिहल, पुलवामा येथे एका संयुक्त कारवाईत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्याच्याकडे शस्त्रसाठा सापडला आहे. भारतीय सैन्यदलाच्या चिनार कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर माहितीच्या आधारे भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ३० नोव्हेंबरच्या मध्यरात्री अरिहल, पुलवामा येथे एक संयुक्त ऑपरेशन सुरू केले. या भागाची घेराबंदी केली. या कारवाईत एका दहशतवाद्याला मारण्यात आले. त्याच्याकडील शस्त्रसाठी जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणी शोध मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
पुलवामा जिल्ह्यातील अरिहल गावात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ या सरकारी दलांच्या संयुक्त पथकाने या भागाची घेराबंदी आणि सर्च ऑपरेशन सुरू केले. या दरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एका दहशतवादी ठार झाला. या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु आहे.
यापूर्वी २२ नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन अधिकारी आणि एक जवान शहीद झाला होता.